MI vs SRH, IPL 2023: रोहित शर्माला विराट आणि धवनच्या स्पेशल क्लबमध्ये सामील होण्याची सुवर्ण संधी, करावं लागेल फक्त हे काम

या सामन्यात मुंबई इंडियन्सची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती असेल, त्याला मोठा विक्रम करण्याची संधी असेल. रोहित दरवर्षी आयपीएलमध्ये फलंदाजी तसेच कर्णधारपदाची ताकद दाखवतो.

Rohit Sharma (Photo Credit - Twiter)

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 203) मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH)  यांच्यात सामना रंगणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती असेल, त्याला मोठा विक्रम करण्याची संधी असेल. रोहित दरवर्षी आयपीएलमध्ये फलंदाजी तसेच कर्णधारपदाची ताकद दाखवतो. अशा परिस्थितीत तो हैदराबादसमोर मैदानात उतरेल तेव्हा त्याच्यासमोर मोठा विक्रम असेल. रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत 5,986 धावा केल्या आहेत आणि 6,000 चा टप्पा गाठण्यापासून तो फक्त 14 धावा दूर आहे. आयपीएलच्या इतिहासात कोहली, धवन आणि वॉर्नर हे तीनच फलंदाज आहेत ज्यांनी ही कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत रोहित या तिघांच्या खास क्लबमध्ये सहभागी होणार आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

1. विराट कोहली – 6844

2. शिखर धवन – 6477

3. डेव्हिड वॉर्नर – 6109

4. रोहित शर्मा – 5986

5. सुरेश रैना – 5528

रोहित शर्माची आयपीएल कारकीर्द

रोहितने आयपीएलमध्ये 232 सामने खेळले असून 30.30 च्या सरासरीने 5,986 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 129.89 राहिला आहे. त्याने आयपीएलमध्ये 41 अर्धशतक आणि 1 शतक झळकावले आहे. नाबाद 109 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. (हे देखील वाचा: MI vs SRH Live Streaming Online: हैदराबाद आणि मुंबई संघ विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी उतरणार मैदानात, इथे पहा लाईव्ह सामना)

मुंबईने 5 आयपीएल विजेतेपदे जिंकली

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने 5 आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत. त्याचवेळी चेन्नई सुपरकिंग्ज या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीच्या कर्णधारपदी CSK ने 4 IPL विजेतेपदे जिंकली आहेत. कोलकाताने 2 आणि हैदराबाद, राजस्थान, गुजरात आणि डेक्कन चार्जर्स (2009) यांनी प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावले आहे.