MI vs SRH Live Streaming Online: हैदराबाद आणि मुंबई संघ विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी उतरणार मैदानात, इथे पहा लाईव्ह सामना
मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात सामना होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.
इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये दररोज अनेक रोमांचक सामने खेळले जात आहेत. या भागात मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात सामना होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व जबरदस्त फॉर्ममध्ये सुरू असलेल्या एडन मार्करामकडे आहे. गेल्याच सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावले होते. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सची कमान रोहित शर्माच्या हाती आहे. गेल्या सामन्यात त्याने कर्णधारपद भूषवले नव्हते, तरीही या सामन्यात तो संघाचे नेतृत्व करू शकतो. दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल 2023 मधील 25 सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. तसेत तुम्ही Jio Cinema अॅपवर सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
Star Sports poster for SRH Vs MI. pic.twitter.com/zzaHpZDbzg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2023 04:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

