बॉक्सिंग डे कसोटीनंतर पॅट कमिन्स याचा कपिल देव, ग्लेन मॅकग्रा आणि मिशेल जॉन्सन यांच्या एलिट यादीत झाला समावेश, वाचा सविस्तर
न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या बॉक्सिंग डे टेस्टच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याला एकही विकेट मिळाली नाही. पण, पहिल्या डावात 5-विकेट घेत कमिन्सने वर्ष 2019 एकूण 99 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे, कमिन्स एका वर्षात सर्वाधिक विकेट्ससह कपिल देव, ग्लेन मॅकग्रा आणि मिशेल स्टार्क याच्या एलिट क्लबमध्ये सामिल झाला.
न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या बॉक्सिंग डे (Boxing Day) टेस्टच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा (Australia) वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) याला एकही विकेट मिळाली नाही. पण, पहिल्या डावात 5-विकेट घेत कमिन्सने वर्ष 2019 एकूण 99 विकेट्स घेतल्या. कमिन्सने यंदा टेस्ट क्रिकेटमध्ये 59, वनडेमध्ये 31, आणि टी-20मध्ये 9 गडी बाद केले आहे. तरीही कमिन्ससाठी सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो एका कॅलेंडर इयरयामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज म्हणून हे दशक पूर्ण केले. कमिन्ससाठी 2019 हे वर्ष खूपच चांगले होते. त्याने स्वत: चा सहकारी मिशेल स्टार्क याला मागे टाकत यंदाचे वर्ष 99 विकेट्ससह पूर्ण केले. यायामध्ये भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील संयुक्तपणे स्टार्कच्या 77 विकेटसह दुसर्या स्थानावर आहे. अशाप्रकारे, कमिन्स एका वर्षात सर्वाधिक विकेट्ससह कपिल देव (Kapil Dev), ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) आणि मिशेल जॉनसन ( Mitchell Johnson) याच्या एलिट क्लबमध्ये सामिल झाला. (AUS vs NZ 2nd Test: स्टीव्ह स्मिथ याचा डेड बॉलच्या निर्णयावरून अंपायरशी झाला वाद, किवी फॅन्सने केली हुटींग, पाहा Video)
देवने 1979 मध्ये (76 विकेट), मॅकग्राएन 1999मध्ये (119 विकेट), आणि जॉनसनने 2009 मध्ये (113 विकेट) घेतल्या होत्या. वेगवान गोलंदाजाने सर्वाधिक विकेट घेण्याचा ऑल-टाइम रेकॉर्ड कमिन्सचा सहकारी आणि आयडल मॅकग्राच्या नावावर आहे. याच्याशिवाय, सर्व प्रकारच्या गोलंदाजांपैकी श्रीलंकेचा महान मुथय्या मुरलीधरन याने 2001 यामध्ये 136 विकेट घेण्याचा रेकॉर्ड अजूनही कायम आहे. दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीस, कमिन्स हा इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू बनला. कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) त्याला लिलावात तब्बल 15.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले.
न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाने अष्टपैलू कामगिरी करत किवी संघाचा 247 धावांनी पराभव केला आणि मालिकेत विजय निश्चित करत 2-0 ने आघाडी मिळवली. यासह, ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये 9 सामन्यात 256 गुणांसह दुसरे स्थान मिळवले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)