2024 ICC Women’s T20 World Cup Points Table Update: बांगलादेशवर 7 गडी राखून पराभव करत दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत दाखल; टी 20 विश्वचषकातील गुण तालिका पहा
या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी झाले आहेत. या संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया, टीम इंडिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना अ गटात ठेवण्यात आले आहे. बांगलादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना ब गटात ठेवण्यात आले आहे.
2024 ICC Women’s T20 World Cup Points Table: 2024 चा आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 3 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. महिला टी 20 विश्वचषक 2024 (ICC Women’s T20 World Cup )हे मूलतः बांगलादेशमध्ये होणार होते. परंतू नंतर तेथील राजकीय गोंधळामुळे महिला विश्वचषक संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये हलवण्यात आला. 10 संघांची महिला क्रिकेट स्पर्धा आता शारजा आणि दुबई येथे खेळवली जात आहे. स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध स्कॉटलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला गेला. दुसरा सामना पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात होणार आहे. (हेही वाचा:ENG W vs SCO W ICC Womens T20 World Cup 2024 Live Streaming: महिला टी 20 विश्वचषकात आज इंग्लंड आणि स्कॉटलंड आमनेसामना, थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?)
बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना जोतीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेश संघाला निर्धारित 20 षटकांत तीन गडी गमावून केवळ 106 धावा करता आल्या. बांगलादेशकडून शोभना मोस्तारीने सर्वाधिक 38 धावांची खेळी खेळली. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अवघ्या 17.2 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेसाठी तझमीन ब्रिट्सने सर्वाधिक ४२ धावांची खेळी खेळली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला आहे.
महिला T20 विश्वचषक 2024 गुण तालिका
गट अ
क्र टीम मॅच विजय पराभव टाय नेट रन रेट गूण
1 ऑस्ट्रेलिया 3 3 0 0 +2.786 6
2 भारत 3 2 1 0 +0.576 4
3 न्यूजीलैंड 3 2 1 0 +0.282 4
4 पाकिस्तान 3 1 2 0 -0.488 2
5 श्रीलंका 4 0 4 0 -2.173 0
गट ब
क्र टीम मॅच विजय पराभव टाय गूण नेट रन रेट
1 इंग्लंड 2 2 0 0 4 +0.653
2 वेस्ट इंडिज 3 2 1 0 4 +1.708
३ द.आफ्रिका 4 3 1 0 6 +1.382
4 बांगलादेश 3 1 2 0 2 -0.844
5 स्कॉटलंड 3 0 3 0 0 -2.671
सर्व संघ आपापल्या गटातील संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील. दोन्ही गटातील टॉप-2 संघांना उपांत्य फेरीत स्थान मिळेल. उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)