2021 ICC T20 World Cup: 'हे' 6 दिग्गज खेळाडू निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे, टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर खेळाला करू शकतात रामराम
2021 मध्ये देखील काही खेळाडू निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे आहेत जे भारतात यंदा ऑक्टोबर महिन्यात आयोजित होणाऱ्या आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषकानंतर निवृत्तीची घोषणा करू शकतात.
2021 ICC T20 World Cup: कोणत्याही खेळाडूसाठी देशासाठी खेळत वर्ल्ड कप (World Cup) जिंकणे एक सन्मानजनक बाब असते. क्रिकेट विश्वात असे अनेक खेळाडू आहेत जे आपल्या मोठ्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकही वर्ल्ड कप जिंकू शकले नाही आणि त्यांनी क्रिकेट कारकिर्दीतून निराशेने निवृत्ती घेतली आहे. प्रत्येक खेळामध्ये फिटनेस हा घटक अतिशय महत्त्वाचा ठरतो. क्रिकेट सारख्या खेळात तर तो अधिक महत्त्वाचा ठरतो. फिलिंग किंवा फलंदाजी करताना दोन्ही वेळा फिटनेस असेल तरच सर्वोत्तम कामगिरी करता येते. क्रिकेटमध्ये सर्वसाधारणपणे 35 ते 40 या वयात निवृत्ती घेतली जाते. 2021 मध्ये देखील काही खेळाडू निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे आहेत जे भारतात (India) यंदा ऑक्टोबर महिन्यात आयोजित होणाऱ्या आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषकानंतर (T20 World Cup) निवृत्तीची घोषणा करू शकतात. (T20 World Cup 2021: केंद्र सरकारकडून टॅक्समध्ये सूट न मिळाल्यास BCCI ला भरावे लागणार तब्बल ‘इतके’ कोटी रुपये)
डेल स्टेन: दक्षिण आफ्रिकेचा 37 वर्षीय वेगवान गोलंदाज डेल स्टेन सध्या आफ्रिकेच्या संघाबाहेर आहे. स्टॅनला क्रिकेट क्षेत्रात पूर्वीप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. अशास्थितीत, तो टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रित करून निवृत्तीची घोषणा करू शकतो. आफ्रिकन संघात स्टेनची टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झाल्यास तो त्याच्यासाठी मोठा क्षण असेल. आफ्रिका संघाकडून स्टेनने 47 टी -20 सामने खेळून 47 डावांमध्ये 64 गडी बाद केले आहेत.
लसिथ मलिंगा: 37 वर्षीय श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची देखील टी-20 विश्वचषक 2021 अंतिम स्पर्धा होऊ शकते. मलिंगाच्या वाढत्या वयाचा परिणाम त्याच्या शरीरावर स्पष्ट दिसत आहे. मलिंगाने श्रीलंकेकडून 101 कसोटी सामने खेळले आहेत आणि 59 डावांमध्ये 101 विकेट तर 226 वनडे सामन्यात 338 आणि 84 टी-20 मॅचमध्ये 107 विकेट घेतल्या आहेत.
शोएब मलिक: 38 वर्षीय पाकिस्तानी ज्येष्ठ फलंदाज शोएब मलिकचा टी -20 वर्ल्ड कप 2021 हादेखील शेवटचा विश्वचषक ठरू शकतो. पाकिस्तान क्रिकेट संघाकडून 35 कसोटी सामन्याच्या 60 डावांमध्ये 35.1 च्या सरासरीने 1898 धावा केल्या आहेत. या व्यतिरिक्त त्याने पाकिस्तानकडून 287 एकदिवसीय सामन्यात 7534 आणि त्याने 116 टी-20 सामन्यात 2335 धावा केल्या आहेत.
इमरान ताहीर: 41 वर्षीय अफ्रिकेचा स्टार फिरकीपटू इमरान ताहिरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विलंबाने संधी मिळाली. अशा परिस्थितीत तो लवकरच क्रिकेट जगाला रामराम करू शकतो. ताहीर आफ्रिकेकडून 38 टी-20 सामने खेळला असून त्याने 63 विकेट्स घेतल्या आहेत.
मोहम्मद हाफीज: पाकिस्तान क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफिज सध्या 40 वर्षांचा आहे, परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची बॅट अजूनही धावा काढत आहे. अशा परिस्थितीत टी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघात त्याची निवड जवळजवळ निश्चित दिसत आहे. हाफिज टी-20 विश्वचषकात शानदार प्रदर्शन करून क्रिकेट विश्वाचा निरोप घेण्याच्या प्रयत्नात असेल.
रॉस टेलर: न्यूझीलंड क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने 8 मार्च रोजी आपला 36 वा वाढदिवस साजरा केला. सध्या न्यूझीलंडच्या संघात प्रभावी युवा फलंदाज समोर येत आहेत, त्यामुळे टेलर टी-20 वर्ल्ड कप 2021 मध्ये शानदार कामगिरी करून आपली क्रिकेट कारकीर्द संपवू शकतो. टेलरने किवी संघासाठी आतापर्यंतच्या 102 टी -20 सामन्यांत 94 डावांमध्ये 1909 धावा केल्या आहेत.