लॉकडाउन काळात पाकिस्तानच्या 17 वर्षीय नसीम शाहने अचूकपणे केली ऑस्ट्रेलियन स्टिव्ह स्मिथच्या अनोख्या बॅटिंग स्टाईलची नक्कल, पाहा हा Video

शाह अचूकपणे स्मिथप्रमाणे डिफेन्स करताना आणि त्याचा स्टान्स देखील या ऑस्ट्रेलियन दिग्गजाप्रमाणेच होता.

पाकिस्तानच्या 17 वर्षीय नसीम शाहने स्टिव्ह स्मिथच्या अनोख्या बॅटिंग स्टाईलची नक्कल केली (Photo Credit: Twitter/Getty)

पाकिस्तानचा (Pakistan) युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहने (Naseem Shah) कोविड-19 च्या उद्रेकामुळे घरी वेळ घालवताना ऑस्ट्रेलियाच्या (Australia) या प्रसिद्ध खेळाडूच्या फलंदाजीचे आश्चर्यकारक अनुकरण केले. कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण जग ठप्प झेल आहे. गेल्या काही दिवसांत या आजाराने वेगवान वेग घेतला आहे आणि हळूहळू गोष्टी हातातून निसटताना दिसत आहे. जागतिक स्तरावर विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर क्रिकेट विश्वही ठप्प पडले आहे. विषाणूच्या वेगाने होणाऱ्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात क्रिकेट स्पर्ध पुढे ढकलल्या किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. तथापि, यामुळे क्रिकेटपटूंना त्यांच्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवायला वेळ दिला. याचे काही क्षण क्रिकेटपटू सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चाहत्यांसमवेत शेअर करत आहे. (अष्टपैलू रवींद्र जडेजाने तलवारबाजी करून दाखविला 'बाहुबली' अवतार; माइकल वॉनने केले ट्रोल तर डेविड वॉर्नर झाला चकित, पाहा Video)

या सर्वांच्या दरम्यान, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीमने नुकत्याच एका व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा महान स्टिव्ह स्मिथच्या (Steve Smith) अनोख्या फलंदाजीचे अनुकरण केले आहे. स्मिथ, तुफान फलंदाजीसाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे आणि क्रीझवर असताना त्याचा एक वेगळ्या स्टान्ससाठी ओळखला जातो. कोविड-19 मुळे मिळालेल्या ब्रेकचा नसीम पूर्ण वापर करून घेत आहे आणि फलंदाजीचा सराव करत आहे. यावेळी शाह अचूकपणे स्मिथप्रमाणे डिफेन्स करताना आणि त्याचा स्टान्स देखील या ऑस्ट्रेलियन दिग्गजाप्रमाणेच होता. जेव्हा तो ऑस्ट्रेलियात होता तेव्हा 17 वर्षाच्या या गोलंदाजाने स्मिथचे अगदी जवळून निरीक्षण केले असेल ज्यामुळे तो त्याच्या फलंदाजीच्या कर्तृत्वाची नक्कल करु शकत असल्याचे दिसत आहे.  पाहा हा व्हिडिओ:

दरम्यान, नसीमने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या खेळल्या गेलेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 3-0 ने पराभूत केले. नंतर, त्याने श्रीलंकेविरुद्ध पाच विकेट्स गडी बाद करत यश मिळविले. या वर्षाच्या सुरूवातीला त्याने बांग्लादेशविरूद्ध शानदार हॅटट्रिक घेतली आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हॅटट्रिक घेण्रात तो सर्वात युवा गोलंदाज ठरला.  त्याचे वय वादग्रस्त ठरले आहे. 17 वर्षीय नसीम त्याच्या वयापेक्षा थोडा मोठा असल्याचा अनेकांना असा विश्वास आहे.