साई सुदर्शन ते श्रेयस अय्यर; इंडियन प्रिमियर लीग 2025 मध्ये चाहत्यांची मनं कोणी जिंकली; पहा 1xBet चा सर्व्हे
श्रेयस अय्यर अर्ध्याहून अधिक चाहत्यांची मत मिळवत रजत पटिदारहून खूप पुढे होता जो दुसऱ्या स्थानावर राहिला. मुंबई इंडियन्सचा हार्दिक पंड्या शुभमन गिलला मागे टाकत फॅन्स रँकिंग मध्ये तिसऱ्या स्थानावर राहिला.
इंडियन प्रिमियर लीगच्या निकालांचा चाहत्यांच्या पाठींब्यावर कसा परिणाम झाला याचा जागतिक कंपनी ने व्यापक अभ्यास केला. सीझनने अनेक आश्चर्यकारक निर्णय दिले. रोयल चॅलेंजर्स बॅंगलोरने पहिले अजिंक्यपद जिंकले, 14 वर्षांच्या वैभव सुर्यवंशीने लक्षवेधी पदार्पण केले आणि साई सुदर्शनने 759 धावा करत दमदार प्रगती दाखवून दिली आणि ऑरेंज कॅप जिंकली.
आमच्या अभ्यासाचा भाग म्हणून 3,000 प्रतिसादींनी सर्व्हेत भाग घेतला. त्यांनी त्यांचा MVP, सर्वात यशस्वी कर्णधार आणि सर्वोत्तम युवा खेळाडू निवडला.
चाहत्यांच्या नुसार इंडियन प्रिमियर लीग 2025 चा सर्वोत्तम खेळाडू
या सीझन आधी, 1xBet ने असाच एक सर्व्हे काला होता - चाहत्यांच्या पसंतीत कसा बदल झाला ते आपण बघू
स्थान | आयपीएल 2025 आधी | आयपीएल 2025 नंतर |
1 | विराट कोहली (27,4%) | साई सुदर्शन (45,40%) |
2 | एम.एस. धोनी (12,50%) | सुर्यकुमार यादव (13,07%) |
3 | रोहित शर्मा (12,4%) | विराट कोहली (8,60%) |
4 | अभिषेक शर्मा (11,1%) | श्रेयस अय्यर (7,05%) |
5 | जसप्रित बुमराह (4,3%) | हेनरिक क्लासेन (4%) |
6 | यशस्वी जयस्वाल (4,2%) | जॉश हेझलवूड (2,80%) |
7 | हार्दिक पंड्या (4,0%) | अभिषेक शर्मा (2%) |
8 | ऋषभ पंत (2,9%) | निकोलस पुरन (1,80%) |
9 | के.एल. राहूल(2,5%) | साई किशोर (1,60%) |
10 | सुर्यकुमार यादव (2,4%) | अर्शदीप सिंग (1,50%) |
साई सुदर्शनने सर्वाधिक जास्त लक्षवेधी प्रगती केली. आयपीएल 2025 सुरू होण्याआधी एक महिना तो चाहत्यांनी निवडलेल्या अव्वल 10 खेळाडूंमध्येही नव्हता. आयपीएल नंतर तो या रॅंकिग्स मध्ये अव्वल स्थानावर पोहचला ज्यात त्याला अर्ध्याहून अधिक मते मिळाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे साई सुदर्शनला सर्वात जास्त पाठींबा त्याच्या मुळच्या तमिळनाडू (5.49%) राज्यापेक्षा महाराष्ट्रातून (11.17%) मिळाला.
फॅन्सची निवडही योग्य ठरली: या आघाडीच्या फळीतील फलंदाजाने जबरदस्त कामगिरी करत सीझन मध्ये 759 धावा केल्या. त्याने दबावाखाली अत्यंत कौशल्याने फलंदाजी करत स्पर्धेत सर्वात जास्त धावा करत ऑरेंज कॅप जिंकली. यात काही शंका नाही की साई सुदर्शनच भविष्य उज्वल आहे आणि भारतीय राष्ट्रीय संघातून तो खेळू शकतो.
सूर्यकुमार यादवला सुद्धा अविस्मरणीय सीझन होता. आयपीएल 2025 नंतर त्याला सीझनच्या आधी केलेल्या सर्व्हच्या तुलनेत 10% मते जास्त मिळाली आणि तो सीझनच्या आधीच्या 10व्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहचला. ही झेप घेण्यामागे जरी तो महाराष्ट्राच्या (9.87%) संघातून खेळत असला तरी मुख्यत्वे उत्तर प्रदेश(12.50%) मधील मत कारणीभूत आहेत.
या खेळाडूची सर्वात जमेची बाजू ही त्याचे सातत्य आहे. या उजव्या हाताने खेळणाऱ्या फलंदाजाने प्रत्येक सामन्यामागे 25+ धावा केल्या आणि स्पर्धेचा MVP पुसस्कार जिंकला. त्याच्या कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनी नियमित सीझनमध्ये चांगली कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली.
भारताचा महान खेळाडू विराट कोहलीला 8.60% मतांसहीत तिसरे स्थान मिळाले. स्पर्धेआधी तो रॅंकिंग मध्ये पहिल्या स्थानावर होता आणि त्याने चाहत्यांच्या अपेक्षा पू्र्ण करत अंतिम सामन्यात महतत्वाची भूमिका बजावत आरसीबीची 18 वर्षांची जेतेपदाची उपेक्षा संपुष्टात आणण्यात मदत केली. परंतू साई सुदर्शन आणि सुर्यकुमार यादव यांच्या इतक्या प्रभावी आणि उठावदार कामगिरीचा अंदाज कुणीच वर्तवला नव्हता त्यामुळे कोहली तिसऱ्या स्थानावर राहीला.
पहिल्या पाच मध्ये श्रेयस अय्यर (7.05%) आणि हेनरिक क्लासेन (4%) ही आहेत. सीझनच्या सुरवातीला कोणीही पंजाब किंग्स कर्णधाराकडून विशेष अपेक्षा ठेवल्या नव्हत्या परंतू त्याच्या शांत आणि कौशल्यपूर्ण नेतृतत्त्वाने अनेकांचे त्याच्याविषयीचे मत बदलून त्याला ४थे स्थान मिळाले. हेनरिक क्लासेननेही चाहत्यांना नव्याने प्रभावित केले ज्यात त्याची 37 चेंडूतील केकेआर विरूद्धची त्याची खेळी होती जी सीझनची सर्वोत्तम कामगिरी होती.
एम.एस. धोनीने सगळ्यात जास्त निराशा केली. आयपीएल 2025 आधी तो चाहत्यांच्या पसंतीच्या रॅंकिंगमध्ये आरामात दुसऱ्या स्थानावर होता परंतू स्पर्धा संपल्यानंतर तो अव्वल 10 मध्येही नाही. यामागे त्याची चेन्नई सुपर किंग्स साठी एकूण निराशादायक कामगिरी कारणीभूत होत ज्यांना फक्त 8 गूण मिळाले आणि त्याचा संघ गुणतालिकेत सगळ्यात शेवटच्या स्थानावर राहीला.
अभ्यासात असे दिसून आले की सगळ्यात जास्त कार्यरत व्होटर्स हे 25-34 वयोगटातील पुरूष होते. सरासरी एकूण मतातील यांचा 30-50% टक्का होता जे मुख्यत्वे खेळाडूवर अवलंबून होते. अभ्यासातून असे दिसून आले की तरूण चाहत्यांमध्ये क्रिकेट बद्दल वाढती लोकप्रियता दिसून आली: 20-24 वयोगटातील चाहत्यांनी मोठ्याप्रमाणावर विराट कोहलीला पसंती दिली जे 25-34 वयोगटाप्रमाणेच होते आणि या दोन गटांनी 33% मते दिली.
इंडियन प्रीमियर लीगचे तीन अव्वल कर्णधार
च्या सर्व्हेच्या निकालानुसार चाहत्यांची पसंती खालीलप्रमाणे दिसून आली:
- श्रेयस अय्यर (पीबीकेएस) — 58,50%.
- रजत पाटिदार (आरसीबी) — 23,20%.
- हार्दिक पांड्या (एमआय) — 3,80%.
पंजाब किंग्सच्या कर्णधाराला अर्ध्याहून अधिक चाहत्यांची मते मिळाली ज्यावर मोठ्या आघाडीने त्याने बाजी मारली. श्रेयस अय्यरला कठीण काळात आपल्या संघाचे नेतृत्व कसे करायचे आणि खेळाडूंना प्रोत्साहीत कसे करायचे हे व्यवस्थित माहित आहे. तर दुसरीकडे तो खेळातही त्याने 175.80 स्ट्राईक रेट सहित अव्वल दर्जाचे कौशल्य दाखवून दिले आहे.
अनेक तज्ञ आणि चाहत्यांना असे वाटते की तब्बल 11 वर्षाांनी पंजाब प्लेऑफ्स मध्ये जाऊ शकला त्यामागे अय्यरचे प्रयत्न कारणीभूत आहे. त्याच्या प्रभावाने फ्रॅचाईजच्या टीमचे भविष्यच बदलून टाकले आणि कदाचित त्याला भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्त्वाची धुरा दिली जाऊ शकते. श्रेयस अय्यरकडे एका विजेत्याची मानसिकता आहे आणि त्याने याचे उदाहरण दाखवले की एक माणूस सुद्धा केवढा फरक घडवू शकतो.
रजत पटिदारला त्याच्यापेक्षा जवळपास अर्धी मत मिळाली परंतू त्याने आरसीबीला त्यांचे पहिले अजिंक्यपद जिंकून दिले. पहिल्यांदा संघाचे नेतृत्व करताना त्याने आपली भूमिका चोख बजावली आणि 143.78 इतक्या प्रभावी स्ट्राईक रेटची नोंद केली. तो आपल्या संघातील सहकार्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकला आणि त्याच्या लढाऊ वृत्तीने आरसीबीने त्यांचे सगळे प्रतिस्पर्ध्याच्या मैदानातील अर्थात अवे सामने जिंकले जे आयपीएलच्या इतिहासात अनोखी कामगिरी आहे.
श्रेयस अय्यर अर्ध्याहून अधिक चाहत्यांची मत मिळवत रजत पटिदारहून खूप पुढे होता जो दुसऱ्या स्थानावर राहिला. मुंबई इंडियन्सचा हार्दिक पंड्या शुभमन गिलला मागे टाकत फॅन्स रँकिंग मध्ये तिसऱ्या स्थानावर राहिला.
असे जे चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण न करू शकले ते
सर्व्हेत चाहत्यांच्यानुसार पाच खेळाडू अपेक्षा पूर्ण करण्यात पूर्ण अपयशी ठरले:
- ऋषभ पंत
- एमएस धोनी
- मोहम्मद शमी
- हार्दिक पंड्या
- अभिषेक शर्मा
फक्त पैशाने क्रिकेट खेळले जात नाही आणि ऋषभ पंतच्या लिलावाने हे सिद्ध केले आहे. ₹27-28 कोटी एवढ्या विक्रमी ट्रान्सफर फी मुळे कर्णधार आणि एलएसजीच्या स्टार खेळाडू असलेल्या पंतवर दबाव आला. सरासरी प्रत्येक सामन्यात पंतने 13-15 धावा केल्या आणि संघाच्या एकूण कामगिरीत त्याचे योगदान हे नगण्य होते. त्यामुळे, लखनऊ सुपर जायंट्सना एवढ्या महागड्या ट्रान्सफर नंतर हवा होता तसा परिणाम मिळू शकला नाही ज्यामुळे ते नियमित सिझनच्या 7व्या स्थानावर राहिले आणि प्लेऑफला मुकले.
चाहत्यांना ऋषभ पंतची धमाकेदार खेळी बघायला मिळालीच नाही, त्या ऐवजी तो सामन्यात खूप आधी बाद झाला. त्याच्या खेळात सातत्या नव्हते आणि कर्णधार म्हणून निर्णयात आत्मविश्वास नव्हता. अनेक चाहत्यांच्या अनुसार तो स्पर्धा सुरू होण्याआधीच दमलेला होता आणि महत्त्वाच्या सामन्यात हरवल्या सारखा वाटला.
एवढ्याच लोकांनी एमएस धोनी हा मोठी निराशा होता असे मत दिले पण ही निराशा ऋषभ पंतच्या अपयशाच्या प्रमाणेच होती. भारतीय क्रिकेटचा महान खेळाडू असलेल्या एमएस धोनीच्या कारकिर्दीचा चमकदार शेवट चाहत्यांना बघायचा होता परंतू तो निवृत्तीची सर्वोत्तम संधी बहुतेक गमावून बसला. तो आता त्याच्या पूर्वार्धाची सावली वाटू लागला आहे.
त्याच्या प्रदीर्घ अनुभवाने तो एक महत्त्वाचा मेंटर आणि डावपेचांच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक होऊ शकतो परंतू एमएस धोनीचा संघाच्या कामगिरीवर विशेष परिणाम होत नाही. तो फंलदाजीला खूप उशिरा म्हणजे 8व्या अथवा 9व्या स्थानावर येतो. अनेक जण त्याच्या तंदुरूस्तीवर आणि गुडघ्याच्या दुखापतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. कर्णधाराची अशी स्थिती असल्याने सीएसकेला प्लेऑफ मध्ये जायची काही संधीच नव्हती. चाहत्यांना वाटते की एमएस धोनीचा काळ आता गेला आहे आणि त्याने निवृत्तीचा विचार करावा कारण तो धमाकेदार पद्धतीने जायची शक्यता कमी आहे.
मोहम्मद शमी ही सर्वात मोठ्या निराशांची यादी पूर्ण करतो. बराच काळ तो भारताच्या गोलंदाजीचा एक हुकमाचा एक्का म्हणून मानला गेला आणि तो 2023 च्या विश्वचषक स्पर्धेचा हिरो होता परंतू तो आयपीएल 2025 मध्ये पार अपयशी ठरला. पावलाच्या दुखापतीने त्याची आधीची लय गमावली आणि त्याचे त्याच्या गोलंदाजीवर नियंत्रण नव्हते जे त्याचे मुख्य अस्त्र होते.
या बरोबरच त्याची खरेदी ही एसआरएच करिता महत्त्वाची गुंतवणूक होती. त्याच्यावर खर्च केलेल्या रकमेनुसार हवा तो परिणाम दिसून आला नाही. मोहम्मद शमीने अनेक सलग सामन्यात प्रति षटक 12 हून अधिक रन दिले आणि पीबीकेएस विरूद्ध त्याची कामगिरी (0/75) ही आयपीएलच्या इतिहासातील एक ठळक अपयश होते.
आयपीएल 2025 चे 10 युवा खेळाडू
या सीझन मध्ये अनेक आशादायक पदार्पण आणि युवा खेळाडूंची दमदार कामगिरी बघायला मिळाली. चाहत्यांच्या हे खेळाडू जास्त लक्षात राहीले.
- साई सुदर्शन — 30,80%.
- वैभव सुर्यवंशी — 29,80%.
- आयुष म्हात्रे — 13,80%.
- प्रियांश आर्या — 8,90%.
- नूर अहमद — 3,20%.
- प्रभसिसरन सिंग — 2,30%.
- हर्शित राणा — 2%.
- विपराज निगम — 1.60%.
- अर्शिन कुलकर्णी 0.90%.
- इशान मलिंगा 0.90%.
सर्वोत्तम युवा खेळाडूच्या चाहत्यांच्या मतात साई सुदर्शनने वैभव सुर्यवंशीला फक्त 1% मागे टाकत बाजी मारली. गुजरात टायटन्सच्या आघाडीच्या फळीच्या यशाचे गमक ह गुणवत्तेचे मिश्रण आणि अधिकचा स्ट्राईक रेट होते(150+). साई सुदर्शन आयपीएल मध्ये 700 पेक्षा जास्त धावा करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आणि त्याने ऑरेंज कॅप जिंकली.
फक्त 14 व्या वर्षी वैभव सुर्यवंशी आयपीएल मध्ये खेळणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आणि अनेक अनुभवी खेळाडूंपेक्षा तो चांगला खेळला. त्याने 7 सामने खेळले आणि 252 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेटही 206.56 एवढा जास्त होता.
त्याचे एवढे कमी वय असूनही वैभव सुर्यवंशी अत्यंत आक्रमकपणे आणि बिनधास्त खेळतो. तो अगदी पहिल्या बॉलपासून षटकार मारतो आणि आक्रमक शैलीचे तो उत्तम उदाहरण आहे. फक्त कल्पना करा की त्याच्याकडे मोठ्या सामन्यांचा अनुभव आला की तो त्याच्या नैसर्गिक गुणवत्तेच्या जोरावर काय करेल. राजस्थान रोयल्सकडे भविष्यासाठीची सर्वात किमती गुंतवणूक त्याच्या रूपात आहे.
आयपीएल ही अनपेक्षित आणि रोमांक क्रिकेट लीग आहे
India Cricket Next Gen study च्या निकालात असे दिसून आले की आयपीएल 2025 च्या मोसमात अनेक रोमांचक सामने, आश्चर्याचे धक्के आणि लक्षवेधी वैयक्तिक कामगिऱ्या दिसून आल्या. या सीझन मध्ये अनेक लक्षवेधी पदार्पण ही बघायला मिळाली – तरूण खेळाडू वेगाने विकसित होत आहेत.
आयपीएल आणि भारतातील राज्यस्तरीय लीगवर बरोबर लक्ष ठेवून राहा आणि क्रिकेट जगतातील नवीन महान खेळाडूंचा उदय अनुभवा.
1xBet बाबत
1xBet ही जागतिक स्तरावर नामांकित बूकमेकर आहे ज्यांना सट्टा उद्योगात 18 वर्षांचा अनुभव आहे. या ब्रँडचे वापरकर्ते हजारो क्रीडा स्पर्धांवर सट्टा लावू शकतात, कंपनीची वेबसाईट आणि अॅप 70 भाषांमध्ये उपलब्ध आहेत. 1xBet कंपनीच्या अधिकृत पार्टनर्स मध्ये FC Barcelona, Paris Saint-Germain, LOSC Lille, La Liga, Serie A, European Cricket Network, Durban Super Giants आणि इतर अनेक नामांकित स्पॉर्ट्स ब्रॅंड्स आणि संघटनांचा समावेश आहे. कंपनीच्या भारतातील ब्रॅंड अॅंबॅसिडर्स मध्ये हेन्रिक क्सालेन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा समावेश आहे. कंपनीला IGA, SBC, G2E Asia, आणि EGR अशा नामांकित आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)