Rohit Sharma Press Conference: 'सर्व संघांना भारताला हरवण्यात मजा येते, पण…', कसोटी मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्माचे बांगलादेशला सडेतोड उत्तर (Watch Video)

या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शांतोच्या विधानाची खिल्ली उडवली ज्यात नजमुल हसन शांतोने भारताविरुद्ध चांगली कामगिरी केल्याबद्दल बोलला होता.

Rohit Sharma (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs Bangladesh  National Cricket Team: भारत आणि बांगलादेशचे संघ गुरुवार, 19 सप्टेंबरपासून पहिल्या कसोटीत आमनेसामने येणार आहेत. चेन्नई येथे होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शांतोच्या विधानाची खिल्ली उडवली ज्यात नजमुल हसन शांतोने भारताविरुद्ध चांगली कामगिरी केल्याबद्दल बोलला होता. नझमुल हसन शांतो म्हणाला, ही एक आव्हानात्मक मालिका असेल, पण पाकिस्तान मालिकेने आम्हाला आत्मविश्वास दिला आहे, प्रत्येक मालिका ही संधी असते, आम्हाला दोन्ही कसोटी जिंकायच्या आहेत, पण आम्हाला आमच्या योजनेवर ठाम राहायचे आहे, आम्ही आमचे काम केले तर, आम्हा चांगला निकाल मिळेल.

रोहित शर्माचे सडेतोड उत्तर

बांगलादेशचा कर्णधाराच्या विधानावर रोहित शर्मा म्हणाला की, सर्व संघांना भारतीय संघाला हरवण्यात मजा येते. त्यांना मजा घेऊ द्या. जेव्हा इंग्लंडचा संघ भारतात आला होता, तेव्हा तेदेखील पत्रकार परिषदेत खूप काही बोलले होते. पण आम्ही त्यांच्या कोणत्याही वक्तव्यावर लक्ष दिले नव्हते. आम्ही फक्त चांगले क्रिकेट खेळण्यासाठी प्रयत्नशील असतो. (हे देखील वाचा: Team India Fielding Training: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहली, केएल राहुल आणि टीम इंडियाच्या इतर क्रिकेटपटूंनी चेन्नईत घेतले क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षण, पाहा व्हिडिओ.)

झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान रोहित शर्माने प्लेईंग-11 ची निवड, केएल राहुलचा खराब फॉर्म आणि टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह स्टाफ सदस्यांबद्दलही बोलले. यासोबतच त्यांनी खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटवरही आपले मत मांडले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif