Coronavirus मुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सेल्फ-आयसोलेशनमध्ये, शेअर केला व्हिडिओ
कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता कोहलीने सर्वांना शक्य तितकी गर्दी टाळण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संपूर्ण जगात पंख पसरवत आहे. शक्यतो गर्दी टाळणे हा एकमेव मार्ग आहे यापासून बचाव करण्याचा. गुरुवारी भारतीय जनतेला संबोधित करतांना धान मंत्री नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी सार्वजनिक कर्फ्यू लागू करण्याचे आवाहन केले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नेही कोरोना टाळण्यासाठी लोकांना सेल्फ-आयसोलेशनमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता कोहलीने सर्वांना शक्य तितकी गर्दी टाळण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कोरोना व्हायरसचा जगभरात परिणाम होत आहे आणि यामुळे स्वत:चे रक्षण करण्यासाठी सामान्य लोकांपासून दिग्गज लोकं स्वत: सेल्फ-आयसोलेशनमध्ये जात आहे. अनुष्का आणि विराटने कोरोना व्हायरसबद्दल एक संदेश देत लोकांना सुरक्षित राहण्यास सांगितले आहे. (Coronavirus: 'जनता कर्फ्यू'ला क्रीडा जगातने दर्शविला पाठिंबा, विराट कोहलीसह 'या' खेळाडूंनी केले आवाहन)
या विषाणूपासून बचाव करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे समाजापासून दूर राहणे. शुक्रवारी सकाळी कोहलीने पत्नी अनुष्कासोबत एक व्हिडिओ बनविला ज्यामध्ये त आयसोलेशनमध्ये जाण्याबद्दल बोलले. कोहलीने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, "काळाची गरज म्हणजे पूर्णपणे आदर करणे आणि सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करणे फार महत्वाचे आहे. घरी रहा आणि निरोगी रहा." या व्हिडिओमध्ये कोहली म्हणाला, "आपल्या सर्वांना माहित आहे की ही वेळ अत्यंत कठीण काळातून जात आहे." "आम्ही सेल्फ-आयसोलेशनचा सराव करीत आहोत' आणि 'तुम्हीही ते करायला हवे' असं म्हणत अनुष्काने प्रतिसाद दिला. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी या जोडप्याने चाहत्यांना त्यांच्या घरी आणि निरोगी रहाण्याचा सल्ला दिला
काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले आणि म्हणाले, 'पंतप्रधान म्हणाले की "जागतिक साथीच्या कोरोनापासून निश्चित होणे योग्य नाही. आपण सावध असणे आवश्यक आहे. आम्ही जेव्हा जेव्हा तुमच्याकडून मागितले तेव्हा तेव्हा लोकांनी निराश केले नाहीत.
Coronavirus: मुंबईत बनावट सॅनिटायझर जप्त; FDAची कारवाई : Watch Video
आज पुन्हा मी 130 करोड देशवासियांकडून काहीतरी मागायला आलो आहे. पंतप्रधान मोदी यांनी 22 मार्च रविवारी जनतेला 'जनता कर्फ्यू' लावण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींनी यासाठी संपूर्ण देशवासियांचा यासाठी सहकार्य मागितला.