विजय मल्ल्या याने शेअर केला ख्रिस गेल सोबतचा खास फोटो, म्हणतो, 'चोर कोण ते तुम्हीच ठरवा'!

यानंतर गेलने आपल्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला,यावर ट्रोल करणाऱ्यांना मल्ल्याने खडेबोल सुनावले आहेत.

Chris Gayle With Vijay Mallya (Photo Credits: Twitter)

इंग्लंड (England) मध्ये सुरु असलेल्या विश्वचषक सामन्यात (World Cup 2019) आतापर्यंत अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे, यातील एक खास नाव म्हणजे किंगफिशरचा (Kingfisher) मालक विजय मल्ल्या (Vijay Mallya), एका सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजचा (West Indies) आक्रमक खेळाडू ख्रिस गेल (Chris Gayle) आणि मल्ल्याची स्टेडियम मध्ये गाठ पडली. यानंतर गेलने आपल्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला, यावर अपेक्षेप्रमाणे नेटकऱ्यांनी गेल आणि मल्ल्या दोघांनाही ट्रोल केलं, पण यावेळी मल्ल्याने स्वतः या ट्रोलर्सना उत्तर दिले आहे. Vijay Mallya चे भारतात प्रत्यार्पण होणार, London कोर्टाने दिली मंजुरी

वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेलने विजय मल्यासोबत फोटो शेअर करताना यावर, बिग बॉसला भेटल्याचा आनंद आहे.असे लिहिले होते, गेलने हा फोटो पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केलं आहे.काहींनी तर त्याला मल्ल्याला कुरिअरने भारतात पाठवण्याचा सल्ला सुद्धा दिला. याच फोटोला रिट्विट करत मल्ल्याने सुद्धा गेलं ला भेटल्याचा आनंद व्यक्त केला पण एवढ्यावरच न थांबता, त्याने आपल्या ट्रोलर्सला सुनावण्याची संधी सुद्धा हेरली. त्यानं इथंही आपण चोर नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. "हा मॅसेज त्या सर्व लूजर्सना आहे जे मला चोर म्हणतायत, गेल्या वर्षाभरापासून मी बँकला पैसे द्यायला तयार आहे. पण तुमच्या बँका पैसे का घेत नाही हे त्यांनाच विचारा आणि त्यानंतर तुम्हीच ठरवा नेमकं चोर कोण आहे."अशा शब्दात मल्ल्याने खडेबोल सुनावले आहेत.

विजय मल्ल्या ट्विट

दरम्यान,आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत न्यायालयाने मल्याच्या मालमत्ता जप्तीला परवानगी दिली होती. तसेच, आर्थिक फरारी गुन्हेगार कायद्या अंतर्गत न्यायालयाने मल्याला आर्थिक फरारी गुन्हेगार जाहीर केले आहे. या निर्णयाला व कायद्याच्या वैधतेविरुद्ध मल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच निर्णय होईपर्यंत मालमत्ता जप्तीच्या कारवाईस स्थगिती द्यावी, अशी मागणी मल्याने केली होती.मात्र, या प्रकरणी न्यायालयाने माल्य्याची विनंती फेटाळून लावली आहे.