खेलो इंडिया युथ गेम्स 2020: महाराष्ट्राने पदक तालिकेत अव्वल स्थान मिळवल्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले खेळाडूंचे अभिनंदन

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एकूण 78 सुवर्णांसह 256 पदके जिंकली आहेत. 13 दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने 78 सुवर्ण, 77 रौप्य आणि 101 कांस्यपदकांसह सलग दुसरी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा जिंकली.

CM Uddhav Thackeray |(Photo Credits: Twitter )

तिसरा खेलो इंडिया युथ गेम्स (Khelo India Youth Games) बुधवारी 22 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या खेळाच्या पदक पालिकेत महाराष्ट्राने (Maharashtra) सलग दुसऱ्यांदा अव्वल स्थान कायम ठेवले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एकूण 78 सुवर्णांसह 256 पदके जिंकली आहेत. 13 दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने 78 सुवर्ण, 77 रौप्य आणि 101 कांस्यपदकांसह सलग दुसरी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा जिंकली. हरियाणा 200 पदकांसह दुसर्‍या स्थानावर आहे, तर दिल्लीने 122 पदकांसह तिसरे स्थान पटकावले आहे. महाराष्ट्राने मिळवलेल्या या उपलब्धतेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्व खेळाडूंचे अभिंनदन केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (डीजीआयपीआर), महाराष्ट्र शासन यांनी शेअर केलेल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री ठाकरेंनी खेळाडूंचे अभिनंदन केले. (Khelo India Youth Games मध्ये सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राने मारली बाजी; 78 सुवर्ण पदकांसह 256 पदके जिंकली)

"खेलो इंडिया यूथ गेम स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्राने पटकावले अव्वल स्थान. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले खेळाडूंचे अभिनंदन. स्पर्धेत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षीही सर्वसाधारण विजेता ठरला, ही बाब अभिमानास्पद," ट्विटमध्ये लिहिले. अंडर-19 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत जलतरणपटू करीना शंकताने दुसरे सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्राला जलतरण स्पर्धेत 18 सुवर्णांसह एकूण 46 पदकं जिंकली. बॉक्सिंगच्या अंतिम सामन्यात उलटफेर पाहायला मिळाला, हरियाणाच्या चार बॉक्सरला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

शिवाय, गुणतालिकेत कर्नाटकने उत्तर प्रदेशला मागे टाकले आणि चौथे स्थान मिळवले. कर्नाटकने आपल्या 32 सोन्यांपैकी 21 जलतरण जिंकले, जे कोणत्याही राज्यासाठी मोठी गोष्ट आहे. कर्नाटकने अखेरच्या दिवशी बॉक्सर निशांत देश आणि टेनिसपटू रेश्मा मुरारीसह चार सुवर्ण जिंकले. पुडुचेरी आणि लडाख यांनीही अंतिम दिवशी पदक पालिकेत स्थान मिळवले.  10 जानेवारीपासून सुरू झालेल्या या खेळांमध्ये सुमारे 37 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे 6800 खेळाडूंनी भाग घेतला होता. या खेळांमध्ये 20 स्पर्धांचे आयोजन करण्यात आली होते.