Australian Open 2021: नोवाक जोकोविचने रचला इतिहास! नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन तर, कारकीर्दीतील 18 वे ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकले

त्याने नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा (Australian Open 2021) जिंकली आहे. हे जोकोविचचे 18 वे ग्रँड स्लॅम (18th Grand Slam Title) जेतेपद आहे.

Novak Djokovic (Photo Credit: Twitter)

सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविच जोकोविचने (Novak Djokovic) इतिहास रचला आहे. त्याने नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा (Australian Open 2021) जिंकली आहे. हे जोकोविचचे 18 वे ग्रँड स्लॅम (18th Grand Slam Title) जेतेपद आहे. जगातील पहिला क्रमांक टेनिसपटू का म्हटले जाते हे जोकोविचने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जोकोविचने अंतिम सामन्यात डॅनियल मेदवेदेवला (Daniil Medvedev) 7-5 6-2 6-2 असा पराभूत करून कारकीर्दीतील 18 वे ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकले. जोकोविच संपूर्ण सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी डॅनियल मेदवेदेवच्या पुढेच होता.

जागतिक क्रमवारीत नंबर वनचा खेळाडू सर्बियाच्या नोवाक जोकोविचने अंतिम फेरीत चौथ्या मानांकित रशियाच्या डेनिल मेदवेदेवचा पराभव करीत सलग दुसऱ्यांदा ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले. टूर्नामेंटच्या अधिकृत वेबसाइट, ऑसोपन डॉट कॉमच्या म्हणण्यानुसार, जोकोविचने एक तास आणि 53 मिनिटे सुरु असलेल्या सामन्यात मेदवेदेवला सलग सेटमध्ये 7-5, 6-2 आणि 6-2 ने पराभूत केले आहे. हे देखील वाचा-IPL 2021: काय सांगता! Chris Morris नव्हे, ‘हा’ भारतीय आहे आयपीएल इतिहासातील 'Most Expensive Player', मिळते इतकी रक्कम

ट्विट-

यापूर्वी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात जोकोविचने ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमचा पराभव केला होता. जोकोविचच्या कारकीर्दीतील हे नववे ऑस्ट्रेलियन ओपन आणि एकूण 18 वे ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif