AUS (W) Vs IND (W), 2nd T20I (Photo Credit: Twitter)

मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारताचा (INDW vs AUSW) 21 धावांनी पराभव केला. या विजयासह पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 172 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 151 धावाच करू शकला. भारताकडून शफाली वर्माने अर्धशतक झळकावले, पण इतर फलंदाजांच्या पाठिंब्याअभावी संघाला विजय मिळविता आला नाही. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि अवघ्या पाच धावांत दोन गडी गमावले.

यानंतर एलिस पेरीने आक्रमक फलंदाजी करताना केवळ 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 2019 नंतर, हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी-20 मधील पहिले अर्धशतक आहे. पेरीने शानदार फलंदाजी करताना 47 चेंडूंत 75 धावांची खेळी केली, ज्यात नऊ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. पेरीने पाचव्या विकेटसाठी ग्रेस हॅरिससोबत 31 चेंडूत 55 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली.

हॅरिसनेही आक्रमक फलंदाजी करत 18 चेंडूत 41 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि अवघ्या पाच धावांत दोन गडी गमावले. यानंतर एलिस पेरीने आक्रमक फलंदाजी करताना केवळ 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 2019 नंतर, हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी-20 मधील पहिले अर्धशतक आहे. हेही वाचा 1997 मध्ये डर्बन एकदिवसीय सामन्यादरम्यान Rahul Dravid ला स्लेजिंग केल्याबद्दल Allan Donald ने मागितली माफी, पहा व्हिडिओ

पेरीने शानदार फलंदाजी करताना 47 चेंडूंत 75 धावांची खेळी केली, ज्यात नऊ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. पेरीने पाचव्या विकेटसाठी ग्रेस हॅरिससोबत 31 चेंडूत 55 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. हॅरिसनेही आक्रमक फलंदाजी करत 18 चेंडूत 41 धावा केल्या.