Australia Bushfire: क्रिकेटपटूंनंतर ऑस्ट्रेलियामधील आग पीडितांच्या मदतीसाठी सरसावले दिग्गज टेनिसपटू
टेनिस जगतातील दिग्गज खेळाडू यांनी ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील अग्नितांडव ग्रस्त पीडितांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. महिला टेनिसची अव्वल खेळाडू ऑस्ट्रेलियाची एश्ले बार्टी, निक किर्जियोस, मारिया शारापोवा आणि अनेक प्रसिद्ध खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आग पीडितांच्या मदतीस आले आहे.
खेळ विश्वातील प्रसिद्ध क्रिकेटपट क्रिस लिन (Chris Lynn) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यांनी ऑस्ट्रेलियाच्या (Australia Bushfire) जंगलातील अग्नितांडव ग्रस्त पीडितांसाठी देणगी जाहीर केली होती. आणि आता टेनिस जगतातील दिग्गज खेळाडू मदतीसाठी पुढे आले आहेत. महिला टेनिसची अव्वल खेळाडू ऑस्ट्रेलियाची एश्ले बार्टी (Ashleigh Barty), निक किर्जियोस, मारिया शारापोवा (Maria Sharapova) आणि अनेक प्रसिद्ध खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आग पीडितांच्या मदतीस आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या वन्य अग्निग्रस्तांना मदत करण्यासाठी बार्टीने या आठवड्यात ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतील देणगी रेडक्रॉस संस्थेला देणार असल्याचे जाहीर केले आहे. जखमी वन्य प्राण्यांच्या मदतीसाठी तिने रॉयल सोसायटीला डॉलर 30,000 देणगी दिल्याचे बार्टी यांनी रविवारी उघड केले. आणि आता तिने ब्रीस्बेन (Brisbane) टेनिस स्पर्धेतून मिळणारी रक्कम रेड क्रॉसला (बहुधा ,000 250,000) देण्याचे निश्चित केले आहे. आगीमुळे अडचणीत सापडलेल्यांना आपण पैसे देणार असल्याचे टेनिसपटू निक किर्जियोस आणि क्रिकेटपटू क्रिस लिन यांनी शुक्रवारी जाहीर केले होते. (ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या आगीत 48 कोटी प्राणी आणि पक्षांचा होरपळून मृत्यू)
दुसरीकडे, रशियाची मारिया शारापोव्हा आणि नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यांनी ऑस्ट्रेलियाच्या बुशफायरच्या रिलीफ फंडसाठी 17,400 डॉलर्स (25,000 एयूएस डॉलर) देण्याचे वचन दिले. शारापोव्हाने ऑस्ट्रेलियाच्या बुशफायर रिलीफ फंडसाठी 17,400 (25,000 डॉलर) देण्याचे जाहीर केले असून जोकोविचलाही असे करण्याचे आवाहन केले आहे. ऑस्ट्रेलियातील अग्निशामक दलाच्या मदतीसाठी सिमोना हलेप, ज्युलिया गोर्जेस यांनीही मदत जाहीर केली आहे. या अकाली संकटाला तोंड देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण देणगी देण्याचे त्यांनी वचन दिले आहे. याशिवाय, टेनिस ऑस्ट्रेलियाने (Tennis Australia) यापूर्वी ब्रिस्बेन, पर्थ आणि सिडनी येथे झालेल्या एटीपी (ATP Cup) चषक स्पर्धेसाठी दिल्या गेलेल्या प्रत्येक ऐस सर्वसाठी 100 डॉलर्सची देणगी जाहीर केली आहे.
शारापोव्हा
जोकोविच
ज्युलिया गोर्जेस
ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आगीत 23 लोक ठार झाले असून सुमारे 6 दशलक्ष हेक्टर (23,000 चौरस मैल) बुशलँड जळून खाक आहेत. ही आग शहरी भागात पसरत आल्याने शुक्रवारी नौदल व हवाई बचाव कार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने ट्विटरवर या अडचणीबद्दल चिंता व्यक्त केली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)