YouTuber Khalid Al Ameri Engaged: दुबईस्थित यूट्यूबर खालिद अल अमेरीने तमिळ अभिनेत्री सुनैनासोबत केली एंगेजमेंट?

लोकप्रिय युट्यूबर खालिद अल अमेरीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने त्याच्या एंगेजमेंट रिंग्जचा फोटो शेअर केला आहे.

Photo Credit: X

YouTuber Khalid Al Ameri : लोकप्रिय युट्यूबर खालिद अल अमेरी आणि सलामा हे सोशल मिडियावरील एक लोकप्रिय कपल होते. मात्र काही दिवसांपूर्वी बातमी आली की, खालिद आणि सलामा विभक्त झाले आहेत. त्यानंतर आता खालिदने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यावरून खालिदच्या आयुष्यात नव्या व्यक्तीने प्रवेश केल्याचे दिसत आहे. खालिदने त्याच्या एंगेजमेंट रिंग्जचा फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट त्वरीत सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर उत्सुकता लागली ती, खालिदने कोणासोबत साखरपुडा केला हे जाणून घेण्याची. खालिदची जोडीदार भारतातील असल्याची माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, ती तमिळ अभिनेत्री सुनैना असल्याचे सांगितले जात आहे. सुनैना काधली, विझुंथेन, समर आणि इतर अनेक चित्रपटांसाठी ओळखली जाते. रिपोर्ट्सनुसार, खालिद आणि सुनैना यावर्षी लग्न करण्याची शक्यता आहे. हेही वाचा: Kalki 2898 AD' Box Office Collection Day 4: बॉक्स ऑफिसवर 'कल्की 2898 एडी' चित्रपटाने गाठला 300 कोटींचा गल्ला, जगभरात कमवले एवढे कोटी 

 

 

एंगेजमेंट पोस्ट :

 

View this post on Instagram

 

A post shared by Khalid Al Ameri (@khalidalameri)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now