पाकिस्तान पाठोपाठ आता चीनी वृत्तपत्रातून खोटी वृत्त पसरवणार्या 'Global Times' वर भारताचा डिजिटल स्ट्राईक; X Account बंद
अनेक पाकिस्तान समर्थक खाती चुकीची माहिती पसरवत आहेत आणि संवेदनशील भू-राजकीय घडामोडींदरम्यान पत्रकारितेच्या नैतिकतेचे आणि जबाबदारीचे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
भारत-पाकिस्तान तणावात भारतीय लष्करी कारवाईबद्दल दिशाभूल करणारे दावे पसरवल्याबद्दल केंद्र सरकारने बुधवारी चीनच्या सरकारी आउटलेट ग्लोबल टाईम्सच्या एक्स हँडलवर बंदी घातली आहे. चीनमधील भारतीय दूतावासाने या टॅब्लॉइडला कडक शब्दांत फटकारले आणि पोस्ट करण्यापूर्वी तथ्ये पडताळून पाहण्याचे आवाहन केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर भारताने केलेल्या हल्ल्यांशी संबंधित वादग्रस्त वृत्तांबददल दूतावासाने इशारा दिलाआहे. अनेक पाकिस्तान समर्थक खाती चुकीची माहिती पसरवत आहेत आणि संवेदनशील भू-राजकीय घडामोडींदरम्यान पत्रकारितेच्या नैतिकतेचे आणि जबाबदारीचे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. नक्की वाचा: Hania Aamir, Mahira Khan सह अनेक पाकिस्तानी कलाकारांची इंस्टा अकाऊट्स वर भारतामध्ये बंदी .
ग्लोबल टाईम्स चं 'X' account बंद
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)