World’s Oldest Person Celebrates 117th Birthday: जगातील सर्वात वृद्ध जिवंत व्यक्ती Maria Branyas यांनी साजरा केला आपला 117 वा वाढदिवस

गिनीजनुसार, मारिया यांना श्रवण आणि हालचाल समस्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक आरोग्य समस्या नाहीत. त्यांच्या दीर्घायुष्याची माहिती मिळण्याची आशा असलेल्या संशोधकांकडून त्यांची वैज्ञानिक चाचणी सुरू आहे.

Maria Branyas Morera, Celebrates 117th Birthday

World’s Oldest Person Celebrates 117th Birthday: जगातील सर्वात वृद्ध जिवंत व्यक्ती मारिया ब्रान्यास मोरेरा यांचा आज 117 वा वाढदिवस आहे. स्पेनच्या कॅटालोनिया येथे त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. मारिया यांचा जन्म 4 मार्च 1907 रोजी सॅन फ्रान्सिस्को, यूएसए येथे झाला होता. मारिया आठ वर्षांचा असताना आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी त्या सॅन फ्रान्सिस्को वरून स्पेनमध्ये परतल्या. अटलांटिक प्रवासादरम्यान, त्यांनी एका कानाने ऐकण्याची शक्ती गमावली आणि क्षयरोगामुळे त्यांच्या वडिलांचे निधन झाले. 118 वर्षीय फ्रेंच महिला लुसील रँडन यांच्या मृत्यूनंतर जानेवारी 2023 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने, मारिया यांना सर्वात वयस्कर जिवंत व्यक्तीचा किताब दिला होता.

गिनीजनुसार, मारिया यांना श्रवण आणि हालचाल समस्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक आरोग्य समस्या नाहीत. त्यांच्या दीर्घायुष्याची माहिती मिळण्याची आशा असलेल्या संशोधकांकडून त्यांची वैज्ञानिक चाचणी सुरू आहे. मारिया यांच्यामते नशीब आणि चांगली आनुवंशिकता, या व्यतिरिक्त सुव्यवस्था, शांतता, कुटुंब आणि मित्रांशी चांगले संबंध, निसर्गाशी जवळीक, भावनिक स्थिरता, कोणतीही चिंता-पश्चात्ताप नाही, भरपूर सकारात्मकता अशा घटकांनीही त्यांच्या दीर्घायुष्यामध्ये भर घातली आहे. (हेही वाचा: Woman Loses Insurance Claim: ख्रिसमस ट्री फेकण्याची स्पर्धा जिंकणे भोवले; महिलेने गमावला तब्बल 7 कोटी रुपयांचा विमा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now