Woman Dies From Drinking Water: दोन मुलांच्या आईचा जास्त पाणी प्यायल्याने मृत्यू; जाणून घ्या काय आहे Water Intoxication स्थिती
अॅशले समर्स असे या महिलेचे नाव असून, ती 35 वर्षांची होती. अॅशले शनिवार, 1 जुलै ते मंगळवार, 4 जुलै दरम्यान तिचा पती आणि मुलांसोबत सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेर गेली होती.
इंडियाना येथील दोन मुलांच्या आईचा खूप पाणी प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अॅशले समर्स असे या महिलेचे नाव असून, ती 35 वर्षांची होती. अॅशले शनिवार, 1 जुलै ते मंगळवार, 4 जुलै दरम्यान तिचा पती आणि मुलांसोबत सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेर गेली होती. त्यानंतर मंगळवारी तिला डोकेदुखीचा त्रास सुरु झाला. आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे तिचा जाणवू लागले व यावेळी अॅशले 20 मिनिटांत 4 बाटल्या पाणी प्यायली. त्यानंतर 6 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. वॉटर टॉक्सिकेशनमुळे तिचा मृत्यू झाल्याचे अहवालात समोर आले. हे एक दुर्मिळ प्रकरण असल्याचे डॉ. आलोक हरवानी म्हणतात.
अतिशय कमी वेळात जास्त पाणी प्यायल्याने वॉटर टॉक्सिकेशनची स्थिती उद्भवते, ज्यामध्ये इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडते. जास्त पाणी प्यायल्याने रक्तातील सोडियमचे प्रमाण बरेच कमी होते, ज्यामुळे सौम्य ते जीवघेण्या समस्या निर्माण होऊ शकतात. या घटनेनंतर अॅशले समर्सचे कुटुंब वॉटर टॉक्सिकेशनबाबत जागरुकता निर्माण करत आहेत. (हेही वाचा: World's Oldest Man Death: जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती Jose Paulino Gomes यांचे निधन; वयाच्या 127 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)