Al-Watan Tower in Gaza Demolished: गाझामधील भीषण हल्लेत अल-वतन टॉवर कोसळला, घटनेचा व्हिडिओ समोर

इस्रायलच्या युद्धाच्या घोषणेनंतर गाझामधील अल-वतन टॉवरवर हल्ला करण्यात आला आहे.

Israeli airstrike hits Al-Watan Tower in Gaza City,

Al-Watan Tower in Gaza Demolished: हमासने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युध्द सुरु झाले आहे. दोन्ही देशांकडून एकापाठोपाठ एक हल्ले होत आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्रालयच्या पंतप्रधानांनीही युध्दाची घोषणा केली आहे. इस्रायलच्या युद्धाच्या घोषणेनंतर गाझामधील अल-वतन टॉवरवर हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये अल-वतन टॉवर कोसळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गाझा येथील अल-वतन टॉवरवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. इस्रायलच्या जोरदार हल्ल्यानंतर अल-वतन टॉवर जळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिथे इमारतीचा काही भाग कोसळला.

इस्लामिक रेझिस्टन्स मूव्हमेंट (हमास) च्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली आहे. इस्रायल पॅलेस्टिनी इस्लामिक रेझिस्टन्स मूव्हमेंटला (हमास) चोख प्रत्युत्तर देईल, असे पंतप्रधान नेतन्याहू यांनी त्यांच्या घोषणेत सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement