Canada: कोलंबियातील आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड; भींतीवर लिहलं 'पंजाब इज नॉट इंडिया', Watch Video

गेल्या महिन्यात, ऑगस्टमध्ये, कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील एका मंदिराची तोडफोड करण्यात आली होती आणि या घटनेत दोन खलिस्तान समर्थकांचा सहभाग आढळला होता.

Vandalism of another Hindu temple in Colombia (PC - Twitter)

Canada: कॅनडातील सरेर ब्रिटिश कोलंबिया येथे एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. श्री माता भामेश्वरी दुर्गा देवी मंदिराच्या भींतीवर काळ्या स्प्रेने 'पंजाब इज नॉट इंडिया' असं लिहण्यात आलं आहे. कॅनडातील सरे, ब्रिटिश कोलंबिया येथील हिंदू मंदिराला लक्ष्य करण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यात, ऑगस्टमध्ये, कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील एका मंदिराची तोडफोड करण्यात आली होती आणि या घटनेत दोन खलिस्तान समर्थकांचा सहभाग आढळला होता. मागील घटनेतही मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी भित्तिचित्र फवारण्यात आले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now