US Shocker: कारमधून गस्त घालत असताना फोनवर Porn Video पाहत होता डेप्युटी; सामान्य नागरिकाच्या गाडीला दिली जोराची धडक

या घटनेनंतर, चौकशीमध्ये ट्रिस्टन मॅकॉम्बरने अपघातावेळी ब्रेक फेल झाल्याचा दावा केला, परंतु डॅश कॅम फुटेजमध्ये तो अपघाताच्या आधी त्याच्या फोनवर काहीतरी पाहत असल्याचे दिसून आले.

प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

सर्वसामान्यपणे पोलीस हे जनतेचे रक्षक समजले जातात. मात्र बरेचदा पोलिसांच्या बेजबाबदार आणि निष्काळजी वृत्तीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. आता अमेरिकेच्या फ्लोरिडामधून (Florida) असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी एका डेप्युटीने शाळेच्या बससाठी थांबलेल्या एका सामान्य नागरिकाच्या गाडीला जोराची धडक दिली आहे. महत्वाचे म्हणजे या अपघातावेळी डेप्युटी आपल्या फोनवर पॉर्न व्हिडीओ पाहत होता. अहवालानुसार, फ्लोरिडाच्या लेक काउंटी येथील डेप्युटी ट्रिस्टन मॅकॉम्बर कथितरित्या आपल्या कारमधून गस्त घालत होता. त्यावेळी गाडी चालवताना तो पॉर्न व्हिडीओ पाहत होता. यामुळे त्याचे लक्ष विचलित झाले आणि त्याने एका गाडीला धडक दिली.

या घटनेनंतर, चौकशीमध्ये ट्रिस्टन मॅकॉम्बरने अपघातावेळी ब्रेक फेल झाल्याचा दावा केला, परंतु डॅश कॅम फुटेजमध्ये तो अपघाताच्या आधी त्याच्या फोनवर काहीतरी पाहत असल्याचे दिसून आले. त्यानंतर मॅकॉम्बरने सांगितले की, तो अपघाताच्यावेळी इतर डेप्युटींसोबत ग्रुप चॅटमध्ये काही संदेश पहात होता. मात्र नंतर त्याने पॉर्न पाहत असल्याचे कबूल केले. मॅकॉम्बरने 3 धोरणांचे उल्लंघन केले होते- घटनेबद्दल खोटे बोलणे, प्रतिबंधित सामग्रीसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरणे आणि अपघाताच्या वेळी सीटबेल्ट न घालणे. यानंतर आता मॅकॉम्बरने आपल्या पदाचा राजीनामा दिला. (हेही वाचा: Elon Musk Supports Priyanka Chaturvedi: यूके बाल लैंगिक शोषण प्रकरणावर Shiv Sena-UBT खासदार प्रियंका चतुर्वेदींनी पाकिस्तानी लोकांना केले लक्ष्य; Elon Musk यांनी दिले समर्थन)

Florida Cop Hits Vehicle While Watching Porn Content-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now