US President Joe Biden पाठोपाठ UK PM Rishi Sunak आज Israel ला देणार भेट!

हमास निष्पाप पॅलेस्टिनी लोकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे. अनेक मुलांसह 2,600 हून अधिक पॅलेस्टिनी लोकांच्या दुःखद नुकसानीमुळे, आम्ही प्रत्येक निष्पाप जीवनाच्या नुकसानाबद्दल शोक करतो. अशी प्रतिक्रिया ऋषी सुनक यांनी दिली आहे.

Rishi Sunak (Photo Credit - Twitter)

US President Joe Biden पाठोपाठ UK PM Rishi Sunak आज  Israel ला भेट  देणार आहेत. या भेटीमध्ये ते Israel च्या पंतप्रधानांना, राष्ट्रपतींना भेट देणार आहेत. आपण इस्त्राईलच्या पाठिशी आहोत हे दर्शवण्यासाठी तसेच युद्धाच्या स्थितीमधील घडामोडी जाणून घेण्यासाठी ते तेथे जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिवसागणिक युद्ध चिघळत असल्याने दोन्ही बाजूने  हजारो जण मृत्यूमुखी पडत आहेत. 'हमास निष्पाप पॅलेस्टिनी लोकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे. अनेक मुलांसह 2,600 हून अधिक पॅलेस्टिनी लोकांच्या दुःखद नुकसानीमुळे, आम्ही प्रत्येक निष्पाप जीवनाच्या नुकसानाबद्दल शोक करतो.' अशी प्रतिक्रिया ऋषी सुनक यांनी दिली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement