Rishi Sunak Concedes Defeat: यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा सार्वत्रिक निवडणुकीत केयर स्टारमर यांच्याकडून पराभव; लेबर पार्टीने पार केला बहुमताचा आकडा
आतापर्यंतच्या निकालात मजूर पक्षाने आघाडी घेतली असून केयर स्टारर विजयाकडे वाटचाल करत आहेत.
Rishi Sunak Concedes Defeat: यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना सार्वत्रिक निवडणुकीत केयर स्टारमर (Keir Starmer) यांच्याकडून पराभव स्वीकारला लागला आहे. दरम्यान, ऋषी सुनक यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. या पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वत: घेतली आहे. या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो आणि किर स्टाररचे विजयाबद्दल अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया ऋषी सुनक यांनी दिली आहे.यूकेमध्ये 650 जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. गुरुवारी रात्री दहा वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर आज म्हणजेच शुक्रवारी निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार ऋषी सुनक यावेळी सरकार बनवताना दिसत नाहीत. तर मजूर पक्षाचे केयर स्टारमर यांनी आघाडी घेतली आहे. ब्रिटनमध्ये निवडणुका पूर्ण झाल्या आहेत, त्यानंतर आता पुन्हा एकदा ऋषी सुनक पंतप्रधानपदावर विराजमान होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंतच्या निकालात मजूर पक्षाने आघाडी घेतली असून केयर स्टारर विजयाकडे वाटचाल करत आहेत. आत्तापर्यंत कंझर्व्हेटिव्ह पक्षाने 13 जागा राखल्या आहेत. तर मजूर पक्षाला 111 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे दोघांमध्ये कमालीचा फरक निर्माण झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)