Pakistan: पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा स्फोट

ग्रेनेड स्फोटात एका पोलिसासह तीन जण जखमी झाले आहेत

(Representational Image (Photo Credits: PTI)

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा स्फोट झाला आहे. पाकिस्तान पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्वेट्टा येथील स्टेडियमबाहेर झालेल्या ग्रेनेड स्फोटात एका पोलिसासह तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, शहरातील एअरपोर्ट रोड येथे फुटबॉल स्टेडियममध्ये सामना सुरू असताना हा स्फोट झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)