'Mystery' Illness Outbreak in Kenya: केनियातील विद्यार्थ्यांना गूढ आजारांची लागण, अनेकांमध्ये अर्धांगवायूची लक्षणे

केनियातील काकामेगा येथील अनेक विद्यार्थ्यांना एका गूढ आजाराने ग्रासले आहे. वरवर पाहता या आजाराची लक्षणे अर्धांगवायू प्रमाणे दिसत आहेत. या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या शरीरातील त्राण निघून गेल्यासारखे वाटत आहे.

केनियातील काकामेगा येथील अनेक विद्यार्थ्यांना एका गूढ आजाराने ग्रासले आहे. वरवर पाहता या आजाराची लक्षणे अर्धांगवायू प्रमाणे दिसत आहेत. या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या शरीरातील त्राण निघून गेल्यासारखे वाटत आहे. विद्यार्थी गुडगेदुखीने ग्रासले आहेत. काही विद्यार्थ्यांना आपला तोलही सांभाळणे कठीण होऊन बसले आहे. हा प्रकार एरेगी गर्ल्स हायस्कूलमध्ये घडल्याचा दावा केला जात आहे. या प्रकारानंतर काही पालकांनी शाळा बंद ठेवण्याची मागणी केली. मात्र, शाळा प्रशासनाने त्यास नकार देत, केवळ पीडित विद्यार्थ्यांना शाळेतून सुट्टी दिली जाईल. बाकीचे वर्ग नियमीत सुरु राहतील असे सांगितले.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement