Sri Lanka Economic Crisis: महागाईविरुद्ध श्रीलंकेमध्ये हिंसक आंदोलन; आंदोलकांनी PM Ranil Wickremesinghe यांच्या निवासस्थानाला लावली आग

श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक संकटादरम्यान देशाचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Sri Lanka Prime Minister Ranil Wickremesinghe (Pic Credit: IANS)

श्रीलंकेतील जनता महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. या ठिकाणी आंदोलकांचा राग शांत होण्याचे नाव घेत नाही आहे. आता देशाचे माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या निवासस्थानाला तेथील लोकांनी आग लावल्याचे वृत्त आहे. जमाव पूर्णपणे हिंसक झाला आहे. भीषण महागाईचा सामना करत असलेली जनता आता श्रीलंकेतील बड्या नेत्यांना लक्ष्य करत आहे. श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक संकटादरम्यान देशाचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी आंदोलकांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या कोलंबोतील निवासस्थानी घुसून निषेध केला. आंदोलकांचा संताप पाहून काही काळासाठी त्यांनी अध्यक्षीय निवासस्थानातून पळ काढला. आंदोलकांनी खासदार रजिता सेनारत्ने यांच्या घरावर दगडफेक आणि जाळपोळ केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement