South Africa Firing: डर्बन येथील वसतिगृहात बंदुकधारींनी केलेल्या गोळीबारात 7 जण ठार, तर 2 जण जखमी

पोलीस प्रवक्ते ब्रिगेडियर जय नायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

शनिवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथील क्वाझुलु-नतालच्या (KwaZulu-Natal) उम्लाझी (Umlazi) येथील कुप्रसिद्ध ग्लेबेलँड्स हॉस्टेलमध्ये (Glebelands Hostel) झालेल्या गोळीबारात सात जण ठार आणि दोन जखमी झाले आहेत. आरोप आहे की 20 ते 40 वयोगटातील पुरुष वसतिगृहाच्या ब्लॉक 57 मधील एका खोलीत दारू पीत होते, तेव्हा अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलीस प्रवक्ते ब्रिगेडियर जय नायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. (हेही वाचा: Mumbai Attacks: मुंबईवरील हल्ल्याच्या कटातील आरोपी अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement