Saudi Arabia Visa: सौदी अरेबियाने दाखवली भारताशी मैत्री; भारतीयांना यापुढे व्हिसासाठी द्यावे लागणार नाही Police Clearance Certificate
Saudi Arabia Visa: भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील सतत दृढ होत असलेल्या संबंधांमध्ये गुरुवारी आणखी भर पडली आहे. सौदी अरेबियाने भारतीय नागरिकांना यापुढे देशाचा व्हिसा मिळविण्यासाठी पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (पीसीसी) सादर करण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे.
दिल्लीतील सौदी दूतावासाने ट्विट केले आहे की, "सौदी अरेबिया आणि भारत यांच्यातील मजबूत संबंध आणि धोरणात्मक भागीदारी पाहता, राज्याने भारतीय नागरिकांना पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्रे सादर करण्यापासून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे." दूतावासाने जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, भारतीय नागरिकांना यापुढे व्हिसा मिळविण्यासाठी पीसीसी सादर करण्याची आवश्यकता नाही. दोन्ही देशांमधील वाढत्या संबंधांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)