Independence Day 2022: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारताला स्वातंत्र्य दिनाच्या विशेष शुभेच्छा

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Russian President Vladimir Putin | (Photo credit: kremlin.ru)

भारत (India) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mohotsav) साजरा करत असुन आज भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन आहे. जगभरातून भारतावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी देखील भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. रशियन-भारतीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीच्या भावनेने विकसित होत आहेत याबाबत रशियाकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. जगभरातून भारताला अमृत महोत्सवाच्या खास शुभेच्छा देण्यात येत आहे. भारताबाहेर वास्तव्यास असलेले भारतीय देखील मोठ्या उत्साहात आज भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now