Alexander Pisarev Dies After Eating Poisoned Watermelon: रशियन MMA फायटर अलेक्झांडर पिसारेवचा विषयुक्त कलिंगड खाल्ल्याने मृत्यू

टॉमहॉक टीमच्या एका सदस्याने रशियन न्यूज एजन्सी टासला सांगितले की, अलेक्झांडर पिसारेव झोपेतच मरण पावला. त्याला कोणतीही दीर्घकालीन आजार नव्हता.

Alexander Pisarev

रशियन एमएमए (MMA) फायटर अलेक्झांडर पिसारेव (Alexander Pisarev) याचे वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. अलेक्झांडरने विषयुक्त कलिंगड खाल्ल्यानंतर त्याचा मृत्यू अन्न विषबाधामुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पिसारेव याने पाच व्यावसायिक एमएमएस फाईट्स केल्या आहेत. त्याचा 3-2 चा रेकॉर्ड होता. अलेक्झांडरचा 30 ऑक्टोबर रोजी अचानक मृत्यू झाला. त्याच्या टॉमहॉक टीमच्या एका सदस्याने रशियन न्यूज एजन्सी टासला सांगितले की, अलेक्झांडर पिसारेव झोपेतच मरण पावला. त्याला कोणतीही दीर्घकालीन आजार नव्हता. टॉमहॉकने पिसारेवच्या निधनाबद्दल एक विधान प्रसिद्ध केले आहे, ज्यात त्याच्या मृत्यूचे कारण दिले गेले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now