Bronx Sex Assault: रस्त्यावर चालत असलेल्या महिलेवर बलात्कार, घटना CCTV कैद

न्युयॉर्कच्या ब्रॉन्क्समध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने रस्त्यावर चालत असलेल्या महिलेसोबत घृणास्पद कृत्य केले आहे. ही घटना जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे

Bronx Sex Assault: Pc TWITTER

Bronx Sex Assault: न्युयॉर्कच्या ब्रॉन्क्समध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यात एका अज्ञात व्यक्तीने रस्त्यावर चालत असलेल्या महिलेसोबत घृणास्पद कृत्य केले आहे. ही घटना जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रस्त्यावर चालत असताना अचानक मागून येऊन आरोपीने महिलेच्या गळ्यात पट्टा बांधला. त्यानंतर तीला जमिनीवर ओढले. यात पीडित महिला बेशुध्द झाली. तीला दोन कारच्या मध्ये नेत तीच्यावर बलात्कार केला. ही घटना 1 मेच्या स्थानिक वेळेनुसार, पहाटे 3 वाजता घडली. मेलरोस शेजारच्या पूर्व 152 व्या स्ट्रीट आणि थर्ड अव्हेन्यूजवळ ही घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकांना या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. पोलिस या आरोपीच्या शोधात आहे. (हेही वाचा-कॉलेज होस्टेलमध्ये रुममेटचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ बॉयफ्रेंडला पाठवणाऱ्या विद्यार्थिनीवर कारवाई)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now