PM Modi In Abu Dhabhi: अबुधाबीमध्ये 'अहलान मोदी' कार्यक्रमात पीएम नरेंद्र मोदींनी भारतीय समुदायाला केले संबोधित, म्हणाले- 'भारताला तुमचा अभिमान आहे' (Watch Video)

यावेळी त्यांनी 'अहलान मोदी' (हॅलो मोदी) कार्यक्रमात यूएईमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या सुमारे 65 हजार लोकांना संबोधित केले.

PM Modi | Twitter

PM Modi In Abu Dhabhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या यूएई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी 'अहलान मोदी' (हॅलो मोदी) कार्यक्रमात यूएईमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या सुमारे 65 हजार लोकांना संबोधित केले. सर्वात आधी अबुधाबीच्या झायेद स्पोर्ट्स स्टेडियममध्ये जमलेल्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, ‘आज अबुधाबीमध्ये तुम्ही नवा इतिहास रचला आहे. तुम्ही यूएईच्या कानाकोपऱ्यातून आणि भारताच्या विविध राज्यांमधून इथे आला आहात. पण प्रत्येकाचे हृदय जोडलेले आहे. आज मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना भेटायला आलो आहे. ज्या देशातील मातीमध्ये तुम्ही जन्म घेतला त्या मातीचा सुगंध मी घेऊन आलो आहे. मी 140 कोटी भारतीयांचा संदेश घेऊन आलो आहे. हा संदेश आहे, भारताला तुमचा अभिमान आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘गेल्या 10 वर्षात यूएईची ही माझी 7वी भेट आहे. आज बंधू शेख मोहम्मद बिन झायेद विमानतळावर माझ्या स्वागतासाठी आले होते. भारतात चार वेळा त्यांचे स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळाली. मी भाग्यवान आहे की, युएईने मला त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार- द ऑर्डर ऑफ झायेदने सन्मानित केले आहे. हा सन्मान फक्त माझा नाही तर करोडो भारतीयांचा, तुम्हा सर्वांचा आहे.’ (हेही वाचा: UPI RuPay Card Service in Abu Dhabi: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर; अबुधाबीमध्ये सुरु केली युपीआय रुपे कार्ड सेवा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)