Italy Boat Accident: इटलीच्या बोट दुर्घटनेत 28 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू

या बोटीमध्ये 180 हून अधिक स्थलांतरित नागरिक प्रवास करत असल्याची माहिती मिळत असून यामुळे मृतांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता

इटलीच्या (Italy) दक्षिण किनारी भागात एक ओव्हरलोड बोट बुडाल्याने झालेल्या (Italy Boat Accident) अपघातात आतापर्यंत 59 स्थलांतरितांचा मृतदेह सापडले आहेत. या बोटीमध्ये 180 हून अधिक स्थलांतरित नागरिक प्रवास करत असल्याची माहिती मिळत असून यामुळे मृतांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या सापडलेल्या मृतदेहांपैकी 28 मृतदेह हे पाकिस्तानी (Pakistan) नागरिकांचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पाकिस्तानी दुतावासांने देखील या बातमीला दुजोरा देत या बोटीमध्ये 40 पाकिस्तानी नागरिक प्रवास करत असल्याची माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement