North Korea Launched Missile: 'उत्तर कोरियाने डागले संशयित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र'; जपानचा मोठा दावा
याआधी उत्तर कोरियाने बुधवारी पहाटे दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे पूर्वेकडे डागली होती.
उत्तर कोरियाने संशयित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडल्याचा दावा जपानने केला आहे. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले की, ‘उत्तर कोरियाने एक संशयित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडले आहे.’
याआधी उत्तर कोरियाने बुधवारी पहाटे दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे पूर्वेकडे डागली होती. ही दोन्ही क्षेपणास्त्रे जपानच्या हद्दीत पडल्याचे दिसून आले. जपानचे संरक्षण मंत्री यासुकाझू हमादा यांनी याबाबत माहिती दिली होती. अमेरिकेने 40 वर्षांत प्रथमच दक्षिण कोरियात आण्विक पाणबुडी तैनात केल्यानंतर बुधवारी हे प्रक्षेपण झाले. आता पुन्हा एकदा उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडले आहे. (हेही वाचा: Sudan Plane Crash: सुदान मध्ये प्रवासी विमान कोसळलं)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)