नोबेल पारितोषिक विजेती Malala Yousafzai ने बर्मिंगहॅममध्ये बांधली लग्नगाठ, सोशल मिडियावर शेअर केली बातमी (See Pics)

मलाला युसुफझाई, 24, मुलींच्या शिक्षणासाठी झटणारी एक पाकिस्तानी कार्यकर्ता आणि इतिहासातील सर्वात तरुण नोबेल शांतता पुरस्कार विजेती आहे.

Malala Yousafzai At the 2019 Cricket World Cup Opening Party (Photo Credits: Twitter/maXes_MB)

नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझाईने बर्मिंगहॅममध्ये एका छोट्या समारंभात लग्नगाठ बांधली. मलालाने असेर नावाच्या तरुणाशी लग्न केले आहे. ही बातमी शेअर करताना मलालाने लिहिले आहे की, 'आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक मौल्यवान दिवस आहे. आसेर आणि मी आयुष्यभर भागीदार होण्यासाठी गाठ बांधली. आम्ही बर्मिंगहॅम येथे आमच्या कुटुंबियांसोबत एक छोटा निक्का समारंभ साजरा केला. आम्हाला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.'

मलाला युसुफझाई, 24, मुलींच्या शिक्षणासाठी झटणारी एक पाकिस्तानी कार्यकर्ता आणि इतिहासातील सर्वात तरुण नोबेल शांतता पुरस्कार विजेती आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)