Nikki Haley on Pakistan: 'पाकिस्तान देतो दहशतवादाला थारा, राष्ट्रपती झाले तर बंद करणार शत्रू देशांना मिळणारा निधी'- निक्की हेली (Watch)

सत्तेवर आल्यास अमेरिकेचा द्वेष करणार्‍या देशांना मिळणारी परकीय मदत पूर्णपणे कमी करेन, असे हेली यांनी सांगितले होते.

Nikki Haley

अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार निक्की हेली यांनी पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अमेरिकेतील 2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवार असलेल्या भारतीय वंशाच्या निक्की हेली म्हणाल्या- जर मी अध्यक्ष झाले तर आम्ही पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांना निधी देणार नाही. निक्की हेली यांनी मंगळवारी सांगितले की, अमेरिकेने चीनला दिलेली मदत कमी केली पाहिजे. हेली म्हणाल्या, 'पाकिस्तान अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्सच्या मदतीला पात्र नाही, तो अमेरिका आणि भारतासारख्या त्याच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध दहशतवादाला आश्रय देतो. अमेरिकन सैनिकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तान पाठिंबा देतो. पाकिस्तानमध्ये 12 हून अधिक दहशतवादी संघटना आहेत. तिथले सरकार चीनला पाठिंबा देते.

सत्तेवर आल्यास अमेरिकेचा द्वेष करणार्‍या देशांना मिळणारी परकीय मदत पूर्णपणे कमी करेन, असे हेली यांनी सांगितले होते. यामध्ये चीन, पाकिस्तान आणि इतर शत्रू देशांचा समावेश आहे. हेली यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने गेल्या वर्षी 46 अब्ज डॉलरची परदेशी मदत खर्च केली, जी इतर कोणत्याही देशापेक्षा कितीतरी जास्त आहे. शत्रूंना मदत म्हणून पाठवण्यात येणारा निधी मी पूर्णपणे थांबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)