US Bridge Collapses Video: मालवाहू जहाज धडकल्याने Moment bridge कोसळला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हाययरल
एक मोठे मालवाहू जहाज धडकल्याने यूएसमधील बाल्टिमोरमधील फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजचा एक भाग कोसळला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. ज्यामुळे अनेक वाहने खाली पाण्यात गेली आहेत. X वर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, पहाटे 1.30 च्या सुमारास, एक जहाज पुलावर आदळले आणि बुडाले.
एक मोठे मालवाहू जहाज धडकल्याने यूएसमधील बाल्टिमोरमधील फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजचा एक भाग कोसळला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. ज्यामुळे अनेक वाहने खाली पाण्यात गेली आहेत. X वर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, पहाटे 1.30 च्या सुमारास, एक जहाज पुलावर आदळले आणि बुडाले. दरम्यान, जहाजाला बुडण्यापूर्वी आग लागली. या घटनेनंतर 'I-695 की ब्रिजवरील दोन्ही मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूकही मोठ्या प्रमाणावर खोळंबली, असल्याचे 'मेरीलँड वाहतूक प्राधिकरणाने X वर पोस्ट केले आहे. दरम्यान, बाल्टिमोरचे महापौर ब्रँडन एम स्कॉट आणि काउंटीचे कार्यकारी जॉनी ओल्सेव्स्की ज्युनियर यांनी सांगितले की आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी आहेत आणि बचावाचे प्रयत्न सुरू आहेत. (हेही पाहा, Francis Scott Key Bridge Collapses: मोठ्या जहाजाची धडक लागल्याने फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज कोसळला, मन विचिलीत करणारा Video आला समोर)
व्हिडिओ