Mexico Shooting: मेक्सिकोमध्ये गोळीबार, 7 पोलिस आणि महापौरांसह 18 जणांचा मृत्यू

घटनास्थळी उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी दुपारी अचानक बंदुकधारी गुरेरो राज्यातील सॅन मिगुएल टोटोलापनच्या सिटी हॉलमध्ये पोहोचला आणि त्याने लोकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली.

प्रातिनिधीक प्रतिमा (Gun-encounter)

मेक्सिकोमध्ये गुरुवारी उघड गोळीबाराची (Mexico Shooting) घटना समोर आली आहे. मेक्सिको सिटी हॉलमध्ये बंदुकधारींनी केलेल्या गोळीबारात महापौरांसह 18 जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी दुपारी अचानक बंदुकधारी गुरेरो राज्यातील सॅन मिगुएल टोटोलापनच्या सिटी हॉलमध्ये पोहोचला आणि त्याने लोकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबारात ठार झालेल्यांमध्ये महापौर कोनराडो मेंडोझा, त्यांचे वडील आणि माजी महापौर जुआन मेंडोझा तसेच सात पोलिसांचा समावेश आहे. पोलिसांनी खबरदारी घेत हल्ल्यानंतर संपूर्ण शहरात नाकाबंदी करून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिस डावपेच आखून गुन्हा ठरवत आहेत.

पाहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)