Mexico City News: रागाच्या भरात बारला लावली आग, मेक्सिको मधील या घटनेमुळे 11 जणांचा मृ्त्यू

मेक्सिकोमध्ये रागाच्या भरात एका व्यक्तीने बारच्या इमारतीला आग लावली. या दुर्घटनेत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Mexico City news Photo credit Twitter

Mexico City News: मेक्सिकोमध्ये रागाच्या भरात एका व्यक्तीने बारच्या इमारतीला आग लावली. या दुर्घटनेत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.  मेक्सिकोच्या उत्तर भागात असणाऱ्या सॅन लुईस रियो कोलोराडो या शहरात ही दुर्दैवी घटना घडली. आरोपी व्यक्तीसोबत गैरवर्तन केल्याबद्दल त्याने मनात राग धरला रागाच्या वृत्तीने त्याने बारला आग लावली. स्थानिक वेळेनुसार शनिवारी ही घटना घडली आहे. बारमध्ये आरोपी महिलांशी गैरवर्तन करत होता, त्यामुळे त्याला बार मधून बाहेर काढण्यात आले. तो भरपूर नशेत असल्याचे अधिकारांनी सांगितले.  बारला आग लावण्यासाठी या व्यक्तीने मोलोटोव्ह कॉकटेलचा वापर केल्याचंही सांगण्यात येत आहे

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement