McKinsey Layoff: प्रसिद्ध मॅनेजमेंट कन्सल्टन्सी कंपनी मॅकिन्सेमध्ये होणार कर्मचारी कपात; 2,000 लोकांना कामावरून काढून टाकणार
आता कंपनी स्वतःची पुनर्रचना करण्याच्या तयारीत आहे.
मॅनेजमेंट कन्सल्टन्सी कंपनी मॅकिन्से अँड कंपनी मोठ्या संख्येने कर्मचार्यांना कमी करण्याचा विचार करत आहे. ब्लूमबर्गच्या मते, मॅकिन्से अँड कंपनी आपल्या 2,000 कर्मचार्यांना कामावरून काढून टाकू शकते. ग्राहकांशी थेट संपर्क नसलेल्या कर्मचाऱ्यांवर या नोकर कपातीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी नोकर कपात आहे. माहितीनुसार, येत्या काही दिवसांत, छाटणीमुळे प्रभावित कर्मचार्यांची संख्या वाढू शकते. कंपनी या कर्मचार्यांना मदत पॅकेज देण्याची शक्यता आहे.
फर्ममध्ये 2012 मध्ये सुमारे 17,000 कर्मचारी कार्यरत होते, जे 2017 मध्ये वाढून सुमारे 28,000 झाले. सध्या कंपनीत सुमारे 45,000 कर्मचारी कार्यरत आहेत. आता कंपनी स्वतःची पुनर्रचना करण्याच्या तयारीत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)