Romania Blast Video: गॅस स्टेशनवर भीषण स्फोट, रोमानियातील घटनेत एकाचा मृत्यू, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

रोमानियामध्ये एका गॅस स्टेशनजवळ भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Romania blast video

Romania Blast Video: रोमानियाची राजधानी बुखारेस्टमध्ये एका गॅस स्टेशनवर स्फोट झाला. शनिवारी झालेल्या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 46 जण जखमी झाले. रोमानिया सरकारने सांगितले की, अपघातात जखमी झालेल्या 46 जणांपैकी 8 जण गंभीररित्या भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या स्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पंतप्रधान मार्सेल सिओलाकू यांनी अपघाताशी निगडित राज्य संस्थांची आपत्कालीन बैठक घेतली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement