Mass Shooting in Prague: प्रागमध्ये विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार; 11 ठार, 24 हून अधिक जखमी
झेक प्रजासत्ताकच्या राजधानीत झालेल्या गोळीबारातील बळी किंवा परिस्थितीबद्दल पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही. ते म्हणाले की, जन पलाच स्क्वेअर येथे मध्य प्रागमधील चार्ल्स युनिव्हर्सिटी फॅकल्टी ऑफ आर्ट्समध्ये ही घटना घडली.
प्रागमधून गोळीबाराची (Prague Mass Shooting) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डाउनटाउन प्रागमध्ये झालेल्या गोळीबारात 11 लोक ठार झाले असून आणि सुमारे 30 जखमी झाले आहेत. महत्वाचे म्हणजे ज्याने गोळीबार केला तो देखील मरण पावला आहे. चेक पोलीस आणि शहराच्या बचाव सेवेने गुरुवारी याबाबत माहिती दिली. झेक प्रजासत्ताकच्या राजधानीत झालेल्या गोळीबारातील बळी किंवा परिस्थितीबद्दल पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही. ते म्हणाले की, जन पलाच स्क्वेअर येथे मध्य प्रागमधील चार्ल्स युनिव्हर्सिटी फॅकल्टी ऑफ आर्ट्समध्ये ही घटना घडली. या ठिकाणी अधिकारी तैनात करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आणि घरातच राहण्याचे आवाहन केले. (हेही वाचा: Israel-Hamas War: गाझामधील पॅलेस्टिनींच्या मृत्यूचा आकडा 20 हजारांवर; मृतांमध्ये 8,000 हून अधिक मुले आणि 6,200 महिलांचा समावेश)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)