Mass Looting at US Mall Videos: कॅलिफोर्नियातील टोपांगा मॉलमध्ये लुटमार, तीस ते पन्नास चोरट्यांचा दरोडा, आरोपींचा शोध सुरु
दक्षिण कॅलिफोर्निया धक्कादायक माहिती समोर येत आहे. दक्षिण कॅलिफोर्निया मॉल मध्ये शनिवारी दरोड्यांनी धुमाकुळ घातला आहे. तीस ते पन्नास लोकांनी मॉलमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.
Mass Looting at US Mall Videos: दक्षिण कॅलिफोर्निया मॉल मध्ये शनिवारी दरोड्यांनी धुमाकुळ घातला आहे. तीस ते पन्नास लोकांनी मॉलमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मॉल मधील सुरक्षा रक्षकांवर स्प्रे मारला. त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. नॉर्डस्ट्रॉम डिपार्टमेंट स्टोअरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दुपारच्या चारच्या वेळी हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. चोरट्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॅनोगा पार्कमधील वेस्टफील्ड टोपांगा मॉलमधील काही सामान चोरले. दोन सुरक्षा रक्षकांवर स्प्रे मारले. वृत्तांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी हजारो डॉलर्स किमतीच्या लक्झरी हँडबॅग्ज आणि उच्च श्रेणीचे कपडे लंपास केले. या घटनेसंदर्भात पोलीसांनी कोणत्याही आरोपीला अद्याप अटक केली नाही. अशी माहिती वृत्तांनी दिली आहे. कॅमेरात कैद झालेल्या या घटनेत आरोपींनी तोंडाला मास्क लावला आहे त्यामुळे त्यांचा शोध अद्याप सुरुच आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)