Macau Tower Horror: मकाऊ टॉवरवरून 233 मीटर बंजी जंप पूर्ण केल्यानंतर जपानी पर्यटकाचा मृत्यू: Reports

रविवारी (डिसेंबर 3) मकाऊ टॉवरवरून बंजी जंप पूर्ण केल्यानंतर 56 वर्षीय जपानी पर्यटकाचा मृत्यू झाला.

बंजी जंप (प्रातिनिधिक, संग्रहित-संपादित प्रतिमा)

Tourist Died After Bungee Jump: जगातील सर्वात उंच बंजी जंप (Bungee Jump) समजल्या जाणाऱ्या चीनच्या मकाऊ टॉवरवर (Macau Tower) एक मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी उडी घेतल्यानंतर एका जपानी पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी (डिसेंबर 3) मकाऊ टॉवरवरून बंजी जंप पूर्ण केल्यानंतर 56 वर्षीय जपानी पर्यटकाचा मृत्यू झाला. हाँगकाँगच्या HK01 या वृत्त साईटने सांगितले की, संध्याकाळी 4.30 च्या सुमारास 233 मीटरवरून उडी मारल्यानंतर या व्यक्तीला दम लागला. त्याला श्वासोच्छ्वास घेण्यास समस्या निर्माण होऊ लागली. नंतर त्याला कोंडे एस जनुरियो रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या ठिकाणी AJ Hacket कडून Skypark द्वारे बंजी जंप व इतर साहसी गीश्ती चालवल्या जातात. 2006 मध्ये पहिल्यांदा लोकांसाठी उघडलेले मकाऊ हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यावसायिक बंजी जंप आहे. (हेही वाचा: France Plane Crash: कॅरिबियन येथील टेरे दे हौते बेटावर विमान कोसळलं, अपघातात पाच जणांचा मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now