London Mass Stabbing Videos: लंडन हादरले! दिवसाढवळ्या व्यक्तीचा तलवारीने सामान्य लोक आणि पोलिसांवर हल्ला, व्हिडिओ व्हायरल (Watch)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने हल्ला करण्यापूर्वी त्याची कार एका घरात घुसवली. यापूर्वीही या व्यक्तीने अनेक लोकांवर आणि पोलिसांवर हल्ला केला होता.

London Mass Stabbing

London Mass Stabbing: लंडनमधून एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. उत्तर-पूर्व लंडनमध्ये एका व्यक्तीने आजूबाजूचे लोक आणि पोलिसांवर तलवारीने हल्ला केला आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. हातामध्ये तलवार घेतलेल्या या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने हल्ला करण्यापूर्वी त्याची कार एका घरात घुसवली. यापूर्वीही या व्यक्तीने अनेक लोकांवर आणि पोलिसांवर हल्ला केला होता. अहवालानुसार या हल्ल्यात 5 लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संशयिताने थर्लो गार्डन परिसरातील एका घरात वाहन घुसवून सामान्य लोक आणि दोन पोलीस  अधिकाऱ्यांवर हल्ला केला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. (हेही वाचा: US Shooting: शार्लोट, नॉर्थ कॅरोलिना, यूएसए येथे गोळीबार, 3 पोलिस अधिकारी ठार)

पहा व्हिडिओ-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement