Live Bomb Inside Body: युक्रेनियन सैनिकाच्या शरीरातून काढला स्फोट न झालेला जिवंत बॉम्ब, पाहा फोटो

धक्कादायक म्हणजे शरीरात जीवंत बॉम्ब असतानाही हा सैनिक जिवंत राहिला. रशिया युक्रेन युद्धादरम्यान बाखमुत येथे एका सैनिकी कारावई दरम्यान हा बॉम्ब या व्यक्तीमध्ये पेरण्यात आला होता.

Live Bomb Inside Body

एका युक्रेनियन सैनिकाच्या शरीरातून जीवंत बॉम्ब काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. धक्कादायक म्हणजे शरीरात जीवंत बॉम्ब असतानाही हा सैनिक जिवंत राहिला. रशिया युक्रेन युद्धादरम्यान बाखमुत येथे एका सैनिकी कारावई दरम्यान हा बॉम्ब या व्यक्तीमध्ये पेरण्यात आला होता. दरम्यान, या बॉम्बचा केव्हाही स्फोट होऊ शकतो हे लक्षात येताच युक्रेनियन सर्जन मेजर जनरल आंद्री व्हर्बा यांनी तो यशस्वीरित्या बाहेर काढला. त्यासाठी या सैनिकावर शस्त्रक्रिया करावी लागली. स्फोटाचा धोका असल्याने केवळ दोन सैनिक आणि डॉक्टर यांच्या उपस्थितीत ही शस्त्रक्रिया पार पडली.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)