Nobel Prize 2023: Katalin Kariko आणि Drew Weissman यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर, या विशेष शोधासाठी देण्यात आले पारितोषिक
नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी कोरोलिंस्का इन्स्टिट्यूटमध्ये विजेत्याची घोषणा केली.
Nobel Prize 2023: यावर्षीच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा सोमवारपासून सुरू झाली. या अंतर्गत आज फिजिओलॉजी किंवा मेडिसिन या क्षेत्रासाठी या सन्मान विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यंदा कॅटालिन कॅरिको (Katalin Kariko) आणि ड्र्यू वेसमन (Drew Weissman) यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी संबंधित शोधांसाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला. या शोधामुळे कोरोनाव्हायरस म्हणजेच COVID-19 विरुद्ध प्रभावी mRNA लस विकसित करण्यात मदत झाली. नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी कोरोलिंस्का इन्स्टिट्यूटमध्ये विजेत्याची घोषणा केली. गेल्या वर्षी, स्वीडनच्या स्वांते पॅबो यांना फिजिओलॉजी किंवा मेडिसीन क्षेत्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. विलुप्त होमिनिन्स आणि मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिक (जीनोम) संबंधित शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.