Kabul Suicide Bombing: काबूलच्या वर्गातील आत्मघातकी बॉम्बस्फोटात 53 जणांचा मृत्यू; 46 मुली व महिलांचा समावेश
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत बहुतांश हजारा आणि शिया लोकांचा मृत्यू झाला आहे.
अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीपासून बॉम्बस्फोटांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा आत्मघातकी हल्ला झाला होता. यावेळी राजधानी काबूलला लक्ष्य करण्यात आले. वृत्तानुसार, काबूलमधील एका शिक्षण केंद्रात आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 53 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 46 मुली आणि महिला आहेत. एएफपी न्यूज एजन्सीने यूएनच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत बहुतांश हजारा आणि शिया लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारा हा अफगाणिस्तानातील तिसरा सर्वात मोठा वांशिक गट आहे. शहराच्या पश्चिमेला असलेल्या दश्त-ए-बरची भागातील काझ एज्युकेशन सेंटरमध्ये हा स्फोट झाला.
Advertisement
संबंधित बातम्या
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Aradhya Suicide Case: हेड कॉन्स्टेबलच्या 14 वर्षीय मुलाची आत्महत्या; वडिलांच्या मित्राकडून छळ झाल्याचा आरोप; Lucknow येथील घटना
Beed Student Suicide: धक्कादायक! अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे AIIMS Bhopal मध्ये शिकणाऱ्या बीडच्या तरुणाची पुण्यामध्ये आत्महत्या
Taliban Chess Ban: अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळ खेळावर बंदी, तालिबान सरकारचा निर्णय धार्मिक कारणांमुळे
Advertisement
Advertisement
Advertisement