Kabul Blast: काबुल येथे स्फोटांची मालिका; मृतांची संख्या 40 वर, 120 जखमी- Reports
अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय- पेंटागॉनने आज संध्याकाळी काबुलमध्ये झालेल्या बॉम्ब ब्लास्ट बद्दल माहिती दिली. सध्या अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणात लोकांना बाहेर काढले जात आहे
अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय- पेंटागॉनने आज संध्याकाळी काबुलमध्ये झालेल्या बॉम्ब ब्लास्ट बद्दल माहिती दिली. सध्या अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणात लोकांना बाहेर काढले जात आहे, या प्रयत्नांमध्ये काबुलच्या विमानतळाजवळ कमीतकमी दोन स्फोट झाले. यातील एक स्फोट विमानतळाच्या एबी गेटजवळ आणि दुसरा बॅरॉन हॉटेलजवळ झाला. आता माहिती मिळत आहे की या स्फोटांमधील मृतांची संख्या 40 वर पोहोचली असून, 120 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)