Job Layoffs: आता Secureworks ने केली नोकर कपातीची घोषणा; कंपनी 9% कर्मचार्यांना काढून टाकणार
कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, 28 जानेवारी 2022 पर्यंत कंपनीचे 2,351 कर्मचारी होते, ज्याचा अर्थ कंपनी आता सुमारे 212 कर्मचार्यांना कामावरून कमी करणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून भारतासह जगातील अनेक कंपन्यांनी नोकर कपात सुरु केली आहे. परिणामी विविध क्षेत्रात अनेक लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. आता SecureWorks Inc. ने मंगळवारी खुलासा केला की खर्चात कपात करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून, कंपनी सुमारे 9% कर्मचार्यांना काढून टाकणार आहे. या सायबर-सुरक्षा कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, 28 जानेवारी 2022 पर्यंत कंपनीचे 2,351 कर्मचारी होते, ज्याचा अर्थ कंपनी आता सुमारे 212 कर्मचार्यांना कामावरून कमी करणार आहे. SecureWorks हे रिअल इस्टेट-संबंधित खर्च ऑप्टिमायझेशन क्रिया देखील लागू करेल. अशाप्रकारे कंपनी $16 दशलक्ष खर्चाची बचत करण्याची अपेक्षा आहे.